बार्शीत शिवजयंतीनिमित्त मोफत अन्न धान्य किटचे वाटप

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
समाजातील गरजूंना अन्न धान्याच्या माध्यमातून मदत करत कोरोना संकटाच्या काळात गरिबांच्या चुली पेटविण्याचे काम ढावारे कुटूंबीयांनी केले असल्याचे गौरवोदगार माजी नगराध्यक्ष योगेश सोपल यांनी काढले.
शिवजयंतीचे औचित्य साधत बार्शीतील अंबरिष भगवंत सामाजिक शैक्षणिक संस्था व धनंजय ढावारे मित्र मंडळाच्या संयुक्तपणे शहरातील गरजू कुटूंबीयांना रिंग रोड येथे मोफत अन्न धान्य किट वाटप करण्यात आले त्यावेळी सोपल प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले होते. यावेळी व्यासपीठावर लहुजी पँथरचे संस्थापक अध्यक्ष संदीपान झोंबाडे, पिंपरी चिंचवड विधानसभा अध्यत्र राजू पवार, सामाजिक कार्यकर्ते राहुल शिर्के, एक मराठा लाख मराठा देशव्यापी संघटनेच्या महाराष्ट्र ,प्रदेश सचिव कल्पना दाखले, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे, अॅड.प्रशांत शेटे, उद्योजक महेश यादव, शिवसेनेच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष सुनीता जाधव, राजा काकडे, निखील मस्के, विजय साळुंके, शिवराज ढावारे, संयोजक धनंजय ढावारे, नगरसेवक सागर कसबे, पंकज बारबोले उपस्थित होते. यावेळी सोपल यांनी ढावारे कुटूंबीयांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाची दखल घेत त्यांच्या दातृत्वाचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात युवराज दाखले म्हणाले, राज्यात कोरोनो महामारीमुळे सर्वच क्षेत्रात बेकारी बेरोजगारी निर्माण झाली टाळे बंदी मुळे सामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले दोन वेळच्या जेवणाच्या प्रश्न निर्माण झाला अशा महासंकटात ढावारे कुटूंबीयांनी समाजातील गरजूंना मोफत अन्नधान्याची मदत करत त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लावला भविष्यातही ढावारे कुटूंबीयांनी समाज उपयोगी विधायक उपक्रम राबवावेत त्यासाठी निश्चितपणे मदत केली जाईल असे सांगितले. यावेळी अॅड.प्रशांत शेटे, नवनाथ चांदणे, निखील मस्के, सुनीता जाधव यांनी समायोचित भाषण करत ढावारे यांच्या मोफत अन्नधान्य वाटप उपक्रमाचे कौतुक केले.
प्रास्ताविकात संयोजक धनंजय ढावारे यांनी भगवंत अंबऋषी सामाजिक शैक्षणिक संस्था तसेच धनंजय ढावारे मित्र मंडळाच्या माध्यमातून आज पर्यंत राबवलेल्या सामाजिक उपक्रमांचा आढावा सादर केला. प्रारंभी कार्यक्रमाची सुरवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाले. यावेळी संयोजकांच्या वतीने मान्यवरांचा फेटा बांधून व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. आभार शिवराज ढावारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनंजय ढावारे मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. कोरोना बाबतची सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजना करत व नियमांचे पालन करत कार्यक्रम घेण्यात आला.