October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत शंभूराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

बार्शी;-

बार्शी येथील छावा प्रतिष्ठान आयोजित छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अॅड. राहुल झालटे,  बापूसाहेब चोबे,पाणीपुरवठा सभापती संतोष बारंगुळे, सुमित बारुंगळे,सचिन काकडे हे उपस्थित होते,
यावेळी  मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्ध व जलाभिषेक करण्यात आला,यावर्षीच्या राज्याभिषेक सोहळ्यात मान्यवर पाहुण्यांसोबत छावा प्रतिष्ठान च्या प्रत्येक पदाधिकार्यांना देखील राज्याभिषेक करण्याचा मान देण्यात आला, मुख्य कार्यक्रम संपन्न झाल्या नंतर राज्यभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून बार्शीतील मातृभूमी अन्नछत्रालय आणि राजमाता इंदूताई अन्न छत्रलाय याठिकाणी प्रत्येकी 100 किलो धान्य वाटप करण्यात आले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार शुभम चव्हाण यांनी केले, तसेच  सर्व पदाधिकारी यांच्यासह सर्व शंभू भक्त यांनी परिश्रम घेतला..

Advertisement

Leave a Reply