बार्शीत वेअर हाऊस मालक व व व्यापाऱ्याकडून माणकेश्वरच्या शेतक-याची 19 लाखांची फसवणूक

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज
वेअर हाऊसमध्ये ठेवलेल्या तुरीची दोघांनी मिळून परस्पर विल्हेवाट लावुन शेतक-याची तब्बल 18 लाख 75 हजार रूपयाची फसवणुक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.शेतक-याची फसवणुक केल्याप्रकरणी वेअर हाऊसच्या मालकासह दोघांवर बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#किरण बाळासाहेब शिराळ रा. घोडके प्लॉट,बार्शी व वामा वेअर हाऊसिंग,भोयरे चे मालक संतोष बागमार रा.बार्शी अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.
#नरहरी साहेबराव अंधारे वय 78वर्षे रा.माणकेश्वर ता. भुम जि.उस्मानाबाद या शेतक-याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की खरीप हंगाम 2019-2020मध्ये दोघा मुलांच्या चाळीस एकर व माझ्या पाच एकर जमिनीत पांढरी तुरीची पेरणी केली होती , चांगली मेहनत करून , खतं फवारणी व अंतर्गत मशागत करून तुरीचे पीक अत्यंत उत्कृष्ट आणले होते. सदरील पिकाची काढणे जानेवारी शेवटी 2020मध्ये केली व मळणी फेब्रुवारी पहिल्या व तिस-या आठवड्यात केली. एकुण तुरीचे उत्पन्न 25टन 795किलो झाले. वरिल तुरी पैकी 10टन 385 किलो दिनांक 10/02/2020रोजी, 12टन 305किलो व 3टन 105 किलो अशी पांढरी तुर दि.19/02/2020रोजी नेहमीचे संबंधातले ओळखीचे बार्शी यार्डातील व्यापारी किरण बाळासाहेब शिराळ दुकान नंबर77, यांच्या आडतीवर विकण्यासाठी आणली.त्यावेळी तुरीचा भाव 4500ते 4700 प्रतिक्विटंल होता. त्यादिवशी किरण शिराळ यांना बजावुन सांगितले की, ज्यावेळी तुरीला रू7500/-प्रति क्विटंल भाव येईल त्यावेळी माझी तुर विकायची. त्यावेळी किरण शिराळ यांनी फिर्यादीस सांगितले की तुरीला साडेसात हजार रूपये प्रति क्विटंल भाव मिऴण्यासाठी आणखी पाच ते सात महिने वेळ लागेल व त्यासाठी सदरील तुर त्यांच्या ओळखीचे संतोष बागमार वामा वेअर हाऊस भोयरे ता.बार्शी येथे ठेवु असे सांगितले व त्यांच्या ओळखीच्या व त्यांच्या मध्यस्थी मार्फत तुरी वामा वेअर हाऊस भोयरे येथे ठेवल्या.
वरिल तुरी पैकी 10टन 385किलो वजन करून दिनांक 10फेब्रुवारी 2020, 3टन 105किलो वजन करून दिनांक 19 फेब्रुवारी 2020 माझ्या नावावर तर 12टन 305किलो तुर वजन करून दिनांक 19 फेब्रुवारी 2020 मुलगा नरहरी अंधारे याच्या नावावर अशी एकुण पांढरी तुर 25टन 795किलो किरण बाळासाहेब शिराळ यांच्या ओळखीचे व त्यांच्यामार्फत संतोष बागमार वामा वेअर हाऊस भोयरे ता.बार्शी या ठिकाणी ठेवली होती. वरिल मालाची नोंद वेअर हाऊसला ठेवलेबाबत त्यांच्याकडे वरिल तारखेला नोंदी आहेत. वरिल माल ठेवल्याची पावती मागितली परंतु सांगण्यात आले की, पावती बुक संपले आहे दोन दिवसात पावती देऊ, किरण शिराळ यांच्यामार्फत तुर माल संतोष बागमार यांच्याकडे ठेवण्यात आली व किरणचा नेहमीच्या संबंध असल्यामुळे फिर्यादीने संतोष बागमार व किरण शिराळ यांच्यावर भरवसा ठेवला की पावती दोन दिवसात देतील. त्यानंतर एका आठवड्याने संतोष बागमार यांना माल ठेवल्याची पावती मागितली परंतु त्यांनी सांगितली की, तुमचा माल ठेवल्याची पावती किरण शिराळ यांच्याकडे दिली आहे असे सांगितले त्यानंतर सदरील पावती किरण यांना मागितली परंतु त्यांनी सांगितले की तुमची पावती घरी ठेवली आहे नंतर देतो.
त्यानंतर 23 मार्च 2020पासुन लकडाऊन सुरू झाल्यामुळे मला बार्शीला जाता आले नाही. लाॅक डाऊन संपल्यावर सुध्दा पावती मागितली पंरतु पावती माझ्याकडे सुरक्षित आहे काळजी करू नका असे किरण शिराळ असे म्हणत असे त्याचे बरोबर ब-याच दिवसापासुन ओळख असल्याचे फिर्यादीने त्याच्यावर विश्वास ठेवला व तो पावती देईल असे वाटले. वर्तमानपत्रात तुरीचा भाव रूपये 7300/-झाल्याचे मी वाचल्यावर किरण शिराळ यांना भेटण्यासाठी त्यांचे दुकान नंबर 77मार्केट यार्ड बार्शी येथे गेले तर दुकान बंद होते.
ते संतोष बागमार यांच्या भोयरे येथील वेअर हाऊसला तुर मार्केटला आणण्यासाठी गेले तर त्यांनी तुरीचा माल देण्यास नकार दिला. त्यानंतर किरण शिराळ यांच्या घरी जाऊन त्याची चौकशी केली परंतु त्याच्या घरच्यांनी उडवाउडवाची उत्तरे दिली व किरणच्या ठावठिकाणा बद्दल काहीही सांगितले नाही. त्यानंतर संतोष बागमार यांच्याकडे मालाची चौकशी केली तर त्यांनी सांगितले की त्यांच्या नोंदीप्रमाणे सदरील तुर किरण ट्रेडिंग कंपनी तर्फे आवक नोंद दि.19फेब्रुवारी 2020रोजी 43 कट्टे (3टन105किलो) माझ्या नावावर नरहरी साहेबराव अंधारे, व जावक दि.5ऑगस्ट 2020. तसेच विजय नरहरी अंधारे यांच्या नावावर आवक मालाची नोंद दि.19फेब्रुवारी 2020रोजी 246कट्टे (12टन 305किलो ) व जावक दि. 6ऑगस्ट 2020रोजी असल्याची नोंद गोडाऊन किपर याने दाखवले. तसेच दिनांक 10फेब्रुवारी 2020रोजी माझे नावावर 10टन 385किलो तुर ठेवल्याची नोंद दाखविली नाही. वरिल पांढरी तुर मी वामा वेअर हाऊसला किरण शिराळ यांच्या ओळखीणे ठेवली वरिल तुर त्यांच्याकडुन मी परत घेतली नाही. व तुर परत घेतल्याबाबत पावतीवर सही केली नाही.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनी शिवाजी जायपत्रे हे करत आहेत.