बार्शीत वीज वितरणला सरपंच परिषदेचे निवेदन

बार्शी ;
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बार्शी तहसील कार्यालय येथे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतीचा वीज पुरवठा नियमित व ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा वीज नियमित करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
बार्शी तहसीलचे नायब तहसीलदार संजीव मुंडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले व महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ बार्शीचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यलयात ठीया आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा व ग्रामपंचायत पाणी पुरवठ्याची वीज दोन दिवसात नियमित करण्यात यावी अन्यथा तालुक्यातील सर्व महावितरण कार्यलयास टाळे ठोक आंदोलन केले जाईल असे सांगण्यात आले. या वेळी सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस अॅड. विकास जाधव,
पंडित मिरगणे, दादा बरबडे, दीपक रोंगे,विकास माने,दिनेश शेंडगे,शंकर पाटील,पपु टेकाळे,
पांडुरंग घोलप,शिवाजी खोडवे, बापूसाहेब गात,
दत्तात्रय सातपुते,अंकुश बांगर,समाधान विधाते,सागर मोहिते,तानाजी जाधव,रामचंद्र जाधव,पांडुरंग देशमुख, तुकाराम सुतार,प्रशांत जाधव,विठ्ठल सुतार,रविराज गाटे,रामहरी फफाळ,अच्युत गरदडे, उपस्थित होते
अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे उपाध्यक्ष अनिल गीते यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.