March 30, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

येथील बारंगुळे प्लॉट मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, माजी नगरसेवक महेदीमियॉं लांडगे, वैभव पाटील, कॉंग्रेसच्या सुप्रिया गुंड-पाटील, भाजपच्या पद्मजा काळे, हाजी सौदागर, नितीन सोडळ, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष वसीम पठाण, आतिश बिसेन, अजित कांबळे, जुबेर बागवान, बंडू माने आदी मान्यवर उपस्थित होते. महेदीमियॉं लांडगे व बारंगुळे प्लॉट मित्रमंडळाच्यावतीने या खुल्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश काटकर, बालाजी डोईफोडे, संतोष कळमकर, सुहास कांबळे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. लिंबू चमचा स्पर्धेत प्रथम क्रमांक ओम जानराव, व्दितीय गौसीया लांडगे, तृतीय आदित्य चौधरी-महेक मुल्ला यांना तर स्लो सायकल स्पर्धेत प्रथम रोहित गरड, व्दितीय प्रणव काटकर, तृतीय हुजेब बागवान, संगीत खुर्ची मध्ये प्रथम सुप्रिया गवळी, व्दितीय हाजराबी उस्ताद, तृतीय ऐश्वर्या शिंदे, चतुर्थ प्राजक्ता कांबळे, उत्तेजनार्थ मंदाकिनी पवार यांना मिळाले.
कृष्णराज बारबोले, वसीम पठाण, अमृत शाळू, डॉ. अंगारशा, नितीन सोडळ, आतिश बिसेन, सुजाता उपरे, आप्पा उदाने, शौर्य पाटील, शाहिद शेख यांनी बक्षिस पुरस्कृत केले होते. 
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी राजन मोमीन, बाबा शेख, शाहीद शेख, इरफान लांडगे, शहेनाज शेख, मुश्ताक जलसे, मंजूर मंद्रुपकर, विकी शिंदे, रफिक पठाण, सुशांत गायकवाड, इक्बाल शेख यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply