June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत लक्ष्मी – सोपान उद्यानाचा लोकार्पण सोहळा संपन्न.. शहरातील विकास कामांसाठी निधी देणार – जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर

बार्शी;-
बार्शी शहरातील लातूर रोड येथे नगर पालिकेच्या वतीने पुणे व मुंबई च्या धर्तीवर शहरातील नागरिक, बालगोपाळ व जेष्ठ नागरिकांना विरंगुळा व्हावा यासाठी बागेची नव्याने निर्मिती करण्यात आली असून या बागेत लहान मुलांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्व सेवा – सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
या बागेमध्ये ओपन जीम,लहान मुलांसाठी मैदान, विविध प्रकारची झाडे, सुगंधित फुलांची झाडे, मानव र्निमित पुल, व्यायामासाठी साहित्य,मॉर्निंग वॉक करण्यासाठी पादचारी मार्ग तयार करण्यात आला आहे या सर्व साहित्यामुळे आणि हिरव्यागार झाडांमुळे आसपासचा संपूर्ण परिसर सुंदर दिसत आहे. या उद्यानाचा लोकार्पण सोहळा सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस विभागाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते,खा. ओमराजे निंबाळकर यांचे बंधू जयराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, नगराध्यक्ष अॅड.असिफ तांबोळी माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, विश्वास बारबोले आदी  उपस्थित होते.
   यावेळी बोलताना जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले आमदार राजेंद्र राऊत यांचा काम करण्याचा उत्साह पाहून सदर कार्यक्रमास उपस्थित राहिलो आहे कोरोना काळात खाजगी हॉस्पिटलचे अधिग्रहण करण्यासाठी त्यांनी केलेली मदत,खाजगी हॉस्पिटल ची संख्या वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे कोरोना रुग्णांवर लवकर उपचार मिळण्यास मदत झाली परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन याचा फायदा शहर व परिसरातील रुग्णांना झाला आहे शहराच्या विकास कामांसाठी जास्तीचा निधी मिळावा यासाठी आमदार राऊत यांचा उत्साह आणि प्रयत्न असतो. पुणे व मुंबई या शहराच्या धर्तीवर लक्ष्मी सोपान उद्यानाची निर्मिती झाली असून या ठिकाणी स्वतः आमदार राऊत यांनी स्वखर्चातून बंधारा बांधल्यामुळे या उद्यानाच्या वैभवात भर पडली आहे उद्यानांमध्ये कचरा, घाण करु नये, झाडे तोडू नये असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. उद्यानाचे संवर्धन करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे नागरिकांनी चांगल्या प्रकारे त्याचा वापर केला पाहिजे शहरासाठी नगरपालिकेने फार विकास निधी खेचून आणला आहे शहरासाठी निधीसाठी बार्शीला यापुढील काळात झुकते माप दिले जाईल व निधी देणार असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले तसेच शहरातील रस्त्यांची सध्याची स्थिती पाहता येणाऱ्या काळात शहरात चांगले रस्ते निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली शासनाची माझी वसुंधरा हे अभियान खूप चांगला उपक्रम असून नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी  बार्शीकरांना केले या कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा माझ्या हस्ते आयोजित केल्याबद्दल नगरपालिकेचे व आमदार राऊत यांचे आभार मानले.
सोलापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते बोलताना म्हणाल्या की बार्शी हा भाग कमी पावसाचा पट्टा असूनही या परिसरात नगरपालिकेने उत्तम रित्या उद्यानाची निर्मिती केली असून या उद्यानामुळे बार्शी करायची चांगली सोय झाली आहे लक्ष्मी सोपान या चांगल्या उद्यानाला आमदार राऊत यांनी आपल्या आजी आजोबाचे नाव दिल्याबद्दल ही खरी आदरांजली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले नागरिकांनी निसर्गाला जपले पाहिजे निसर्गाशी मैत्रीचे संबंध निर्माण केले पाहिजे सध्या सर्वच ठिकाणी झाडे कमी दिसत आहेत नागरिक ज्या ठिकाणी हिरवी झाडे आहेत सुंदर निसर्ग आहे अशा ठिकाणीच राहण्यासाठी त्यांचा कल असतो किंबहुना प्रयत्न असतो. नगरपालिकेच्या वतीने शहरात ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली असल्याची माहिती मला मिळाली ऑक्सिजन पार्क ही संकल्पना चांगली असून याबद्दल नगरपालिकेचे अभिनंदन केले तसेच लक्ष्मी सोपान या उद्यानाची निर्मिती पुणे-मुंबई या शहराच्या प्रमाणे झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला यावेळी त्यांनी पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबासह शहरातील विविध बाग बगिच्यात भेट देऊन दिवसभरातील कामाचा थकवा धूर करून आनंद  घेण्याचा सल्ला दिला. आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की बार्शी शहरातील नागरिकांना आपल्या कुटुंबासह फिरण्यासाठी कुठेही ठिकाण नसल्याने नगरपालिकेच्या मालकीच्या शहरातील विविध भागात असलेल्या बाग-बगीचा नूतनीकरण व शुशोभिकरण करून नागरिकांसाठी खुल्या केल्या आहेत. लक्ष्मी सोपान उद्यान मुळे बार्शीच्या वैभवात भर पडेल तसेच पुणे-मुंबईच्या धर्तीवर याची निर्मिती करण्यात आली आहे.

Advertisement


शहरातील विकास कामांसाठी माझा पहिल्यापासून प्रयत्न असतो तसेच शहरात अनेक विकास कामे करण्यासाठी निधीची अडचण येत असल्याने जिल्हाधिकारी यांनी शहराचा वाढता विस्तार पाहून निधी उपलब्ध करून द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले उपस्थित सर्वच मान्यवरांना  बार्शी नगरपरिषदेच्या वतीने  माजी वसुंधरा  या उपक्रमाच्या  प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले कार्यक्रमासाठी सर्व नगरसेवक अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर कांबळे यांनी केले तर आभार मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी मानले.

Leave a Reply