June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत रविवारी रक्त तपासणी शिबीर ; लायन्स क्लब चा उपक्रम

बार्शी:
लायन्स क्लब बार्शी, लायन्स क्लब बार्शी टाऊन, लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनी न कोठारी लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने ७ फेबुवारी ते १० फेबुवारी दरम्यान सर्व नागरीकांसाठी अल्पदरात रक्त तपासणी  तर दिनांक 15 ते 20 फेब्रुवारी या दरम्यान मोफत दंत रोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रोजेक्ट चेअरमन डॉ आदित्य कोठारी यांनी दिली.

या मध्ये रक्तातील पेशींची तपासणी, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडणी फंक्शन टेस्ट, थायरॉईड प्रोफाईल, लिपीड प्रोफाईल, ब्लड शुगर (एचबीए। सी) या ६० प्रकारच्या
तपासण्या करण्यात येणार आहेत. २५०० रु. च्या तपासण्या शिबीरामध्ये केवळ ७०० रु. मध्ये केल्या जाणार आहेत.

वय वर्ष ३५ च्या पुढील सर्वांनी वर्षातुन एकदा या तपासण्या करुन घ्याव्यात असे आरोग्य संघटनेव्दारे सांगीतले जाते. तरी गरजु नागरीकांनी याचा लाभ घ्यावा.
या साठी प्रकल्प प्रमुख ला. आदित्य कोठारी तर समन्वयक म्हणून ला. डॉ. प्रांजली कुलकर्णी व ला. गिरीष शेटे हे काम पाहणार आहेत.

कोठारी लॅब पटेल चौक व शिवाजी नगर या दोन्ही शाखेत सकाळी ७.३० ते ११.३० पर्यंत रक्ताचे सॅम्पल देता येईल. रक्त तपासणीस देण्यासाठी उपाशी पोटी यावे असे अवाहन लायन्स क्लब तर्फे केले आहे.
दंत तपासणी शिबीर हे जगदाळे मामा हॉस्पिटल आणि समर्थ डेंटल क्लीनिक येथे आयोजित केले आहे.

शिबीराचे उदघाटन नगराध्यक्ष ला. असिफ तांबोळी यांच्या हस्ते व झोन चेअरमन ला. रविप्रकाश बजाज ,ला. प्रांताध्यक्ष वैभवी बुडुख  यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

Leave a Reply