बार्शीत “भोंग “या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात

बार्शी ;
विश्वनाथ सोमेश्वर घाणेगांवकर दिग्दर्शित “भोंग चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरूवात मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे. बार्शी तुळजापूर रस्त्यावरील कदमवस्ती येथील भगवान ढाळे यांच्या शेतघराच्या प्रांगणात हा उपक्रम पार पडला. “भोंग ही मानसशास्त्रावर आधारित प्रेमकथा असून ब्लॅक पर्ल चित्रनिर्मिती संस्थेच्या माध्यमातून सुमारे दोन महिन्यांत चित्रपटाच्या शुटींगचे काम पूर्ण होणार आहे.
यावेळी सहनिर्माते सोमेश्वर घाणेगांवकर, श्रीमती यमुनाबाई घाणेगांवकर, नगरसेवक विलास रेणके,माजी नगरसेविका विजयश्री पाटील, माजी मुख्याध्यापक भिमराव राजगुरू, रामचंद्र इकारे, मुख्याध्यापक राजेंद्र आडसूळ आदींनी मनोगते व्यक्त केले.
या चित्रपटासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते विजय गोखले, तानाजी फेम राजदेव जमदाडे, ख्वाडा व बंदिशाळा फेम अनिल नगरकर, रश्मी घाटपांडे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून शिवप्रसाद कदम व हर्षदा आडसूळ हे चित्रपटाचे नायक नायिका आहेत. तसेच ज्येष्ठ पत्रकार राजा माने, शितल बोरकर, सूरज काळे, विजयश्री पाटील आदी वेगवेगळ्या भूमिकेतून आपल्याला दिसणार आहेत.
विश्वनाथ घाणेगांवकर (लेखन, दिग्दर्शन, पटकथा संवाद), माधूरी, सई देशामाने (पटकथा संवाद), आशिष गवारे, संकेत शिंदे (कॅमेरामन), मनिष सोनकांबळे (नेपथ्य), ऋषिकेश बनसोडे (पार्श्वसंगीत व गाणी), आशिष गवारे (एडिटींग), मयूरी नाकाडे (मेकिंग), अमोल घायतिडक, रोहन, रामा (मेकअप) तर प्राेडक्शन टिममध्ये अमोल घाडगे, अभिजित सामृत, अक्षय साखरे, अनिकेत गाडे, शुभम जगदाळे आदींचा चित्रपट निर्मितीसाठी मोलाचा वाटा आहे.
याप्रसंगी सहनिर्माते सोमेश्वर घाणेगांवकर म्हणाले, चित्रपट निर्मिती हा जगन्नाथाचा रथ आहे, आमच्यासाठी हे नवीन आणि मोठे आव्हान असून, मोठ्यांच्या आशिर्वादाने व अनेकांच्या सहकार्याने आम्ही ते पूर्ण करुत असा आम्हाला विश्वास आहे. बार्शी शहरात गेली तीसपस्तीस वर्षे साहित्यिक, सांस्कृतिक व नाट्यक्षेत्रात केलेल्या कामाचा अनुभव या चित्रपट निर्मितीसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
या कार्यक्रमाप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब आडके, उमेश स्वामी, दादा कोरे, ज्याेतीआण्णा कदम, सुरेश वायकर, प्रमोद चंद्रशेखर, शैलेश घाणेगावकर, प्रतिज्ञा घाणेगावकर, प्रा.माधुरी शिंदे, ममता चोप्रा, उषा आडसूळ, आशिष राजगुरु, बालाजी पोकळे, योगेश घंटे, वसंत स्वामी, अार.के.शिंदे, धनू डिगे, मधू आणेराव आदी उपस्थित होते. अनिल जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.