June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत भरदिवसा पावने पाच लाखांची घरफोडी, बार्शीत चोरीची मालिका सुरूच

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी शहर व तालुक्यात चोरीची मालिका सुरूच आहे.बंद घराचा कुलुप कोयंडा तोडुण घरात प्रवेश करून घरातील सोन्या चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा 4 लाख 65 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी भर दिवसा लंपास केल्याचा प्रकार बार्शीतील उपळाई रस्त्यावरील चव्हान प्लाॅट मध्ये घडला.

Advertisement

#श्रीकांत पंडीत कुलकर्णी वय 60वर्षे,रा. उपळाई रोड ,चव्हाण प्लाॅट,बार्शी, यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की ते कुटुंबीयांसह एक़ञीत राहतात.दुपारी 03/00 वाजता ते व पत्नी मेडीकल तपासणी करीता बार्शीतील हॉस्पीटल मध्ये घराला कुलुप लावुन गेले होते. त्यानंतर 05/00 वा चे सुमारास ते घरी परत आले असता घराच्या मुख्य बंद दरवाज्याचे कुलुप कोयंडा तोडलेला दिसला. तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते.घरातील गोदरेजचे कपाट तोडुन त्यात ठेवलेली रोख रक्कम दहा हजार रु व सोन्याचे व चांदीचे दागिने हे कपाटात ड्रॉवरमध्ये ठेवले होते ते दिसले नाही.तेंव्हा  कोणीतरी अज्ञात चोरट्याने  घराचा कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश करुन सोने चांदीचे दागिने व रोख रकमेची चोरी केल्याचे लक्षात आले.
   चोरट्यांनी 10000/-रु रोख रक्कम ,67000/- रु किमतीचे 4 सोन्याच्या पिऴ्याच्या अंगठ्या व 1 बदामाची सोन्याची अंगठी, 120000/-रु किमतीचे 3 तोऴ्याचे पिवऴे काऴे मणी ञिकोणी पदक असलेले सोन्याचे मंगऴसुञ,40000/-रु किमतीचे 1 तोऴ्याचे सोन्याचे नेकलेस ,120000/-रु किमतीच्या 3 तोऴ्याच्या ठशाची चपटी डिजाईन असलेल्या सोन्याच्या पाटल्या,40000/-रु किमतीचे 1 तोऴ्याचे काऴे पिवऴे मणी असलेले सोन्याचे मिनी गंठण ,40000/-रु किमतीचे 1 तोऴा वजणाच्या 2 गोप डिजाईन असलेल्या सोन्याच्या चैन,8000/- रु किमतीचे 4काणातील सोन्याच्या रिंगा 2 ग्रँम वजणाच्या ,4000/- रु किमतीची सोन्याची 1 ग्रँम वजणाची सोन्याची नथ, 12000/-रु किमतीचे चांदीचे दागिने असा एकुण 465000/- ऐवज लंपास केला.
बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply