October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत प्रशासकीय अनास्था: मागील 2 महिन्यापासून रेशनची तूर व हरभरा दाळ गोदामातच


बार्शी ;
बार्शी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानामार्फत देण्यात येणारी तूरदाळ व हरभरा दाळ मागील 2 महिन्यापासून शासकीय गोदामात साठवून ठेवण्यात आला असुन त्याचे त्वरित वितरण करण्यात यावे अशी मागणी युवक काँग्रेस बार्शी विधानसभा अध्यक्ष निखिल मस्के यांनी बार्शी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की प्रशासकीय अनास्थेमुळे बार्शी शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमार्फत देण्यात येणारी तूरडाळ व हरभरा डाळीचे वाटप मागील 2 महिन्यापासून झालेले नाही. तरी तुरदाळ व हरभरा दाळ शासकीय गोदमातच पडून असल्याने खराब होण्याची शक्यता असल्याने व गोरगरीब रेशनधारक दाळी पासून वंचित राहत आहेत .
याबाबत युवक काँग्रेस बार्शी विधानसभा अध्यक्ष निखिल मस्के यांनी तहसीलदार व महसूल नायब तहसीलदार यांची समक्ष भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी महसूल नायब तहसीलदार काझी यांनी तात्काळ पुरवठा करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे तोंडी सांगण्यात आले.

Leave a Reply