October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत नगरपालिकेकडून थकबाकीदारांचे गाळे सिल

बार्शी ;
बार्शी नगरपालिका मिळकत विभागाच्यावतीने थकित करापोटी बार्शी शहरातील गाळे व टपऱ्या यांना सिल करण्याची कारवाई आज सोमवार पासून सुरू  करण्यात आली.
आज सकाळी मुख्याध्य्याकारी अमिता दगडे – पाटील यांच्या मार्गर्शनाखाली मिळकत विभागाचे महादेव बोकफोडे, संतोष कांबळे,रोहन कांबळे,अजय कांबळे यांच्या पथकाने बार्शी बस स्थानकाच्या पश्चिम बाजूचे चार गाळे व फौजदार बंगल्याच्या पाठीमागील बाजूचे दोन असे सहा गाळे सिल केले. पन्नास हजार रुपयांच्या पुढे थकबाकी असणारे गाळे सिल करण्यात आले.नगरपालिकेच्या खुल्या जागा,टपरी,उपविधी मधील जागा यांची वसुली मोहीम सुरू आहे.
मिळकत विभागाच्या वतीने शनिवारी सुट्टीच्या दिवशीही पाच लाख रुपयांची कर वसुली केली.तर सोमवारी तेवीस लाख रुपयांच्या पुढे वसुली करण्यात आली.कर दात्यानी कर भरणा करावा असे आवाहन मिळकत विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply