February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत डॉ.गोडगे यांच्या साई सुपर स्पेशालिटी आणि सोनोग्राफी सेंटरचा शुभारंभ

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
         बार्शीचे न्यूरोसर्जन डॉ. किशोर गोडगे व त्यांच्या रेडिओलोजिस्ट पत्नी डॉ.सौ.राजबाला किशोर गोडगे यांच्या साई सुपर स्पेशलिटी व सोनोग्राफी सेंटर चे उद्घाटन बार्शी चे धन्वंतरी  डॉ. बी वाय यादव यांच्या हस्ते करण्यात आले.
           यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरचे सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. सुहास घुले व डॉ.सौ. स्वाती घुले उपस्थित होत्या. त्याच बरोबर श्री. संतोष कानगुडे व डॉ. सौ. मनीषा कानगुडे हेही उपस्थित होते. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी चे श्री बप्पा पाटील व जयकुमार शितोळे तसेच जगदाळे मामा हॉस्पिटल चे डॉ. आर व्ही जगताप, डॉ. कुमार जगताप , डॉ.मोहिरे , डॉ.विलास देशमुख ,डॉ.राहुल मांजरे,डॉ. नवदिप लोकरे, डॉ.प्रदीप जाधव, डॉ.महेश शेळवणे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ. गोडगे दांपत्यांना शुभेच्या दिल्या .
              डॉक्टर किशोर गोडगे यांचे माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र विद्यालय बार्शी व उच्च माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे झाले असून एम बी बी एस चे शिक्षण मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले. त्यानंतरचे एम. एस. (जनरल सर्जन) चे शिक्षण सुरत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यापीठात पहिला येत गोल्ड मेडल मिळवून पूर्ण केले. एम. सी. एच. (न्यूरोसर्जरी) चे शिक्षण त्यांनी मुंबई तील सुप्रसिद्ध शासकीय बॉम्बे हॉस्पिटल अँड रीसर्च सेंटर येथून घेतले. त्यानंतर अमेरिकेतील शिकागो विद्यापीठ व फ्लोरिडा विद्यापीठात जाऊन दुर्बिणीद्वारे मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केले. मागील चार वर्ष ते शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे कार्यरत होते. तेथे त्यांनी 4500 पेक्षा जास्त मेंदु व मणक्याच्या जटील शस्त्रकिया केल्या. दुर्बिणीद्वारे मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रिया करण्यामध्ये त्यांचे विशिष्ट प्रावीण्य आहे. ते सध्या बार्शीतील सुप्रसिद्ध जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये ट्रॉमा केअर युनिट चे चीफ कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत.
                     डॉ राजबाला किशोर गोडगे यांचे एमबीबीएस चे शिक्षण लोणी येथून झाले व रेडिओलॉजीस्ट  चे शिक्षण त्यांनी नाशिक येथील प्रसिद्ध वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय येथे घेतले. गर्भातील व्यंगाचे सोनोग्राफी द्वारे निदान करण्यामध्ये त्यांचे विशेष प्राविण्य आहे.या अगोदर मुंबई येथील फोर्टीस हॉस्पिटल व पीकले हॉस्पिटल व त्यानंतर शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये त्या कार्यरत होत्या. यापुढे त्या बार्शीतील प्रथम महिला सोनोग्राफी तज्ञ म्हणुन बार्शीकरांची सेवा करतील.
                   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  महेश गोडगे , शादाब काझी ,  राहुल शिंदे व  तेजस नाईनवरे यांनी परिश्रम घेतले.

Advertisement

Leave a Reply