बार्शीत जागतिक चिमणी दिनानिमित्त पक्षांसाठी अन्न, पाणी व निवारा सप्ताह, चिमणी-पाखरांच्या एक हजार आकर्षक घरांच्या निमिर्तीचे उद्दीष्ट

बार्शी :महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी येथील वीरशैव लिंगायत समाज, जाणीव फाउंडेशन आणि वृक्ष संवर्धन समिती या सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आिण अॅनीमल फ्रेंडसच्या सहभागातून जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून पक्षांसाठी अन्न, पाणी व निवारा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. रुद्रभूमी (लिंगायत स्मशानभूमी) येथील कै.विश्वनाथ चनबसप्पा आजरी निवारा सभागृहात हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. सप्ताहात निर्माण करण्यात आलेली एक हजार आकर्षक खाद्यघरे शहराच्या विविध भागांत, पक्षांसाठी सुरक्षित असलेल्या ठिकाणी लावली जाणार आहेत. याप्रसंगी घरगुती वापरातील टाकावू वस्तूंपासून पक्षांसाठी निवारा आणि खाद्यघरे कशी तयार करायची याची प्रात्यक्षिके दाखवून कार्यशाळाही घेण्यात आली.
यावेळी विलास रेणके, प्रा.रमेश आजरी, अॅड.आनंद मस्के, उमेश काळे, अभियंता गणेश वाघमारे, नागजी लामतुरे आदी उपस्थित होते.
उपक्रम यशस्वीतेसाठी जाणीव फाउंडेशनचे दिपक पाटील, संतोष मस्के, संतोष कात्रे, नाना मारकड, पवन खरसडे, वसंत हवालदार, राणा देशमुख, तुळशीदास मस्के, संतोष मस्के, किरण लुंगारे, संतोष पवार, सौदागर मुळे, किशोर आकुसकर, अॅनीमल फ्रेंडसचे ऋषीकेश कापसे, बालाजी देशमुख, ललित अग्रवाल, गौरव साठे, अक्षय घोडके, निखिल अडसूळ, दिपक कसबे, शेखर देशमुख, अतुल घोडके, शशि भोसले, सौरभ गरड, वृक्ष संवर्धन समितीचे अतुल पाडे, संपतराव देशमुख, उमेश नलावडे, शशि पोतदार, चारुदत्त जगताप, अजित देशमुख, उदय पोतदार, बाबासाहेब बारकुल, स्वप्नील पांडे, राहुल काळे, सुधीर वाघमारे, वीरशैव लिंगायत समाजचे मनिष वायकर, राहुल झाडबुके, सतिश होनराव, उमाकांत बुगडे, विवेक डोंबे, भारत डोंगरे आदी परिश्रम घेत आहेत.
——-
चिमणी पाखरांच्या एक हजार घरांसाठी लोकसहभाग
सामाजिक जाणीवेतून वििवध सामाजिक संघटनांनी एकत्र येवून एकहजार घरांच्या उद्दीष्टाचा संकल्प करुन सुरू केलेल्या उपक्रमासाठी लागणाऱ्या साहित्यापैकी महत्वाचे असलेले १५ किलो खाद्यतेलाचा रिकामा डबा उपलब्धतेनुसार विनामूल्य देण्याचा मनोदय अनेक व्यापारी व उद्योजकांनी व्यक्त केला आहे.
पत्र्याच्या रिकाम्या डब्याच्या बाजूंना काही अंतर सोडून चौकोतील तीन रेषांचा काप घेवून न कापलेल्या रेषेतून घडी घालून त्याला ट्रे सारख आकार दिला जातो, सरळ राहण्यासाठी त्याला लोखंडी बायडिंग तारेने आधार दिला जातो, यात पक्षांना त्यांचे खाद्य खाण्यासाठी बसण्याची सोय, तर आतील बाजूस त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टीकचे अथवा खापराचे भांडे ठेवले जाते.