बार्शीत जलतरण चालकावर दंडात्मक कारवाई

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड स्पीड
कोरणा महामारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जाहीर केलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात शनिवार व रविवार असे दोन दिवस सर्व दुकाने आणि अस्थापने (अत्यावश्यक सेवा वगळून ) बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र,शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयातील कर्मवीर जलतरण तलाव आदेश झुगारून सुरूच असल्याचे आढळून आले. त्यामुळे, संबंधित तलाव चालकावर बार्शी नगरपालिकेच्या पथकाने कोविड नियमाचा भंग केल्याबद्दल कारवाई केली.
बार्शी नगरपरिषद मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व बाजारपेठ बंद असतानाही शिवाजीनगर भागातील कर्मवीर जलतरण तलाव चालूच होता. तसेच, तलाव परिसरात अनेकजण विना मास्क आढळून आले आहेत. या विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून संबंधित जलतरण चालकाकडून दंडात्मक कारवाई म्हणून ५ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.
दरम्यान, सदरची धडक कारवाई ज्योती मोरे, स्वच्छता निरीक्षक शब्बीर वस्ताद, नितीन शेंडगे, वाहन चालक दीपक खुडे यांनी केलेली आहे. त्यामुळे, विनाकारण कारवाईचा बडगा रोखायचा असेल, तर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाने केल्या आहेत.