October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत छावा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन साजरा

बार्शी ;
बार्शीतील छावा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांचा जय घोष करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी ज्येेष्ठ पत्रकार नानासाहेब गव्हाने, गणेश गोडसे,संजय बारबोले,बाळासाहेब पाटील, सुमित बारुंगळे,सागर मगर, सचिन काकडे हे मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छावा प्रतिष्ठान चे अध्यक्ष शुभम तुपे, अजिंक्य बारंगुळे,सागर बारंगुळे,शुभम  चव्हाण, समर्थ तुपे, शुभम निंबाळकर, अक्षय पुटे, प्रसाद डिसले,श्रेयस बारंगुळे,विशाल शिंदे,दीपक कोकाटे,रोहित घोलप वैभव काथवटे आदी शंभू भक्त भक्तांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply