December 3, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत चाकुचा धाक दाखवुन फोटोग्राफरला लुटले

बार्शी:-

फोटो शुट करण्यासाठी गेलेल्या फोटोग्राफरला चाकुचा धाक दाखवून कॅमे-यासह दोन लाख एक्का  ऐंशी हजार रूपये किंमतीचा ऐवज पळवुन नेल्याचा प्रकार आज गुरूवारी दि.28  रोजी सकाळी 8.40 वाजण्याच्या सुमारास बार्शी शहरातील कॅन्सर हॉस्पिटलच्या पाठीमागे घडला.

Advertisement

#कन्हैया शिवाजी डमरे वय 23 वर्षे रा. वायकर प्लॉट, सुभाषनगर बार्शी या फोटोग्राफरने बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आज सकाळी 08:40 वा.चे सुमारास कथले विहार कॅन्सर हॉस्पीटलचे पाठीमागे बार्शी येथे फोटोशुट करीत असताना 2,79,000/- रू चे कॉनॉन कंपनीचा कॅमेरा,सिंगमा कपनीची लेन्स, कॉनॉन कंपनीची बॅटरी, एक हिरव्या रंगाची शक व मोटर सायकलची चावी एक फिक्कट रंगाची शाल पांघरलेला अंगाने जाड व उंची अंदाजे 5 फुट असलेला इसमाने चाकुचा धाक दाखवुन जबरदस्तीने चोरून नेली.फिर्यादीने चोरट्याचा पाठलाग केला असता काळया रंगाचा टि शर्ट व ब्ल्यु रंगाची जिन पॅन्ट घातलेला व चेहरावर काळे रंगाचे मास्क असलेला अंगाने जाड असलेला इसमाच्या काळ्या रंगाचे स्प्लेंडर मोटर सायकलवर बसुन चोरटा व दुचाकीस्वार कॅन्सर हॉस्पीटलचे दिशेने पळुन गेले.

आज  सकाळी 7:48 वा.चे सुमारास फिर्यादीच्या मोबाइल नंबर वर फोन आला की, आज माझे फोटोशुट करावयाचे आहे. मला पुन्हा कामावर जावयाचे असल्याने तु लवकर ये. असे म्हणाल्याने फिर्यादी सकाळी 8:30 वा.चे सुमारास कथले विहार या ठिकाणी मोटर सायकलवरून गेले. त्यावेळी शॅकमधुन कॅमेरा काढुन शॅक मोटर सायकलवर ठेवली व मोटर सायकलची चावी गाडीला ठेवुन ज्याने  फोन केला होता तो तेथे हजर होता त्याकडे कॅमेरा घेवुन गेले. त्यावेळी  त्यास चल आपण येथेच फोटोशुट करू तेथे काही फोटो काढले त्यानंतर त्याने मला येथे फोटो नको आपण आणखीन आत जावुन फोटो काढु असे म्हणाल्याने फिर्यादी व ज्याचे फोटो काढावयाचे तो असे दोघेजन रोडपासुन 100 ते 150 मिटर आत गेलो तेथे फोटोशुट करीत असताना अंदाजे 08:40 वा.चे सुमारास एक इसम अंगावर फिक्कट चॉकलेटी रंगाची शाल अंगावर पांघरलेली होती. त्याच शालीने त्याचे तोंड झाकलेले होते. त्यावेळी त्याने आम्हाला येथे काय करता असे विचारले त्यावेळी मी त्यास फोटोशुट करतो असे सांगितले.तेव्हा त्याने मला तुझा कॅमेरा मला दे असे म्हणून माझा कॅमेरा ओढु लागला तेव्हा फिर्यादीने कॅमेरा दोन्ही हाताने छातीवर घटट पकडुन ठेवला तेव्हा त्या चोरट्याने झटापट करूत त्याने त्याचे शालीमध्ये लपवलेला चाकु काढुन फिर्यादीचे अंगावर उगारू लागला.
   त्यावेळी फिर्यादीस भिती वाटल्याने ते मागे सरकत असताना  तोल जावुन खाली पडले. तेव्हा चोरट्यांने कॅमेरा हिसका घेवुन कॅमेरा घेवुन तेथुन तो पळुन गेला.
  उठुन त्याचा पाठलाग केला तेव्हा रोडवर एक इसम काळा टिर्शट व ब्ल्यु जिन पॅन्ट घेतलेला व तोंडास काळया रंगाचा मास्क घालुन स्प्लेंडर गाडीवर मोटर सायकल चालु करून बसलेला होता. माझा कॅमेरा घेवुन पळालेला इसमा हा रोडवर थांबलेल्या स्प्लेंडर मोटर सायकलवर बसुन ते कॅन्सर हॉस्पीटलकडे निघुन गेला.बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply