March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत चाकुचा धाक दाखवुन दरोडा,अकरा लाख लंपास

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

घरात एकच महिला असल्याचा अंदाज घेऊन घराच्या जिन्याचे लोखंडी कुलुप तोडुन घरात प्रवेश करून सहा जनांनी मिळुन एका महिलेस चाकुचा धाक दाखवुन रोख रक्कम व सोन्या चांदीचे. दागिणे असा 11 लाख 34 हजार सहाशे रूपयांचा ऐवज दरोडा टाकून जबरदस्तीने लुटुन नेल्याचा प्रकार आज दि.5 शुकवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडला.

#कालिंदा ईश्वर मुंढे वय 51 वर्षे  रा. गौतम मंगल कार्यालयाजवळ सुभाष नगर मुळ रा.तांबेवाडी ता. भूम  यांनी याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की

मुले शेतीच्या कामासाठी तांबेवाडी येथे जात असतात व तेथेच मुक्कामास थांबत असतात.  नातवंडे लहान असल्याने त्या त्यांना घेऊन राहतात.काल त्या काम करुन नातवंडासह  घराचे बेडरुममध्ये झोपल्या होत्या. दरम्यान रात्रौ 02:00 वाचे सुमारास त्यांना अचानक धक्का लागल्यामुळे झोपमोड झाली.तेव्हा खोलीची लाइट चालू होती. झोपलेल्या खोलीमध्ये अंदाजे वय 20 ते 25 वर्षे वयाचे,

हाफ जिन्स पॅन्ट व जर्कीग घातलेले चार अनोळखी इसम त्यांच्या जवळ ऊभे होते व खोलीच्या दरवाज्याजवळ एक इसम उभा होता.

तसेच खोलीच्या खिडकीच्या बाहेर एक इसम उभा होता त्याचे हातात मोठा बांबु होता .घरामध्ये आलेल्या चार लोकापैकी एकाचे हातामध्ये मोठा सूरा होता व एकाचे हातात चौकोनी लांकडी दांडके होते. फिर्यादी झोपेतून उठल्याचे पाहून त्यांच्या जवळ उभे असलेल्या एका इसमाने हातातील सूरा दाखवून बेडवर झोपलेल्या स्थितीतच दाबून दरडावून “ए आज्जे (माल सांग कुठंय” असे विचारले त्यावेळी मी घाबरुन जाऊन ओरडत असताना खोलीत खिडकीजवळ ऊभा असलेल्या आनखीण एकाने त्यांचे तोंड बेडवरील गोधडीने दाबून धरुन आहे त्या स्थितीत दाबून धरले. त्यानंतर त्या चोरट्यांनी खोलीतील लोखंडी कपाट उचकटून कपाटाचे लॉकरमध्ये ठेवलेली काळया रंगाची सॅक व त्यामधील सोन्याचे दागिने ठेवलेला पितळी डब्बा घेऊन ते लोक घरातून निघुन गेले.

अज्ञात सहा चोरटयांनी घराचे जिन्यातील दरवाज्याचे लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून व खिडकीतून बांबूने खोलीच्या दरवाजाची आतील कडी काढून घरात प्रवेश करुन  सु-याचा धाक दाखवून गोधडीने तोंड दाबून घरातील  सोन्याचांदीचे दागिणे, रोख रक्कम व कापडी सॅकसह चोरुन नेले आहे. अनोळखी सहा जनावर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर, पो.नी. संतोष गिरीगोसिवी,गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी  यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.अधिक तपास सपोनी उदार हे करत आहेत.

Leave a Reply