September 27, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत चक्का जाम आंदोलन

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी तसेच राज्य व केंद्र शासनाने स्वामीनाथन आयोग(हमी भाव) लागू करावा यासह ईतर मागण्यांसाठी आज शनिवारी बार्शीतील पोष्ट चौकात संभाजी ब्रिगेडने आयोजित केलेल्या चक्का जाम आंदोलनात समविचारी पक्ष व संघटनाकडुण सहभाग घेण्यात आला

आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे आनंद काशिद,अल्पसंख्यांक क्राॅग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष वसीम पठान, तानाजी बोकेफोडे,बालाजी डोईफोडे,राकेश नवगिरे, इब्राहिम शेख,रामराजे ताकभाते, नाना तिकटे,नवनाथ मोरे,गणेश सावळे आदी सहभागी झाले होते.

#शेतक-यांच्या मतावर निवडुण आलेले केंद्र सरकार शेतकरी मानत नसलेले कायदे अंमलात आणु पहात आहे.शेतक-यांना देशोधडीला लावण्याचे काम हे सरकार करत आहे.
#क्राॅग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष वसिम पठाण यावेळी आंदोलकासमोर बोलताना म्हणाले.
की सत्त्ताधारी केंद्र शासनाने देश विक्रीला काढला असुन सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवत असुन दोन गुजराथींना देश विकण्याचे काम सुरू आहे.

#विक्रम सावळे म्हणाले की झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी हा लढा अजुन  तीव्र केला जाईल.
#यावेळी अब्बासभाई शेख,पांडुरंग घोलप,अजित कांबळे,तानाजी बोकेफोडे आदीनी विचार व्यक्त केले.

  शेतकरी विरोधी तिनही कायदे मागे घ्यावे,बार्शी तालुक्यातील २०१८-१९ चा दुष्काळ निधीचे तात्काळ वाटप करावे,शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा योग्य दाबाने करावा,सन २०२० अतिवृष्टी चा निधी राहिलेल्या सर्व शेतकर्यांना मिळावा,विमा कंपनीनेजाचक् अटी रद्द करण्यात,रेशन कार्ड,दुबार नाव लावणे, कमी करणे विभागणी करणे आदी समस्या सोडवण्यासाठी गावोगावी शिबिर आयोजित  करावी यासाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
तब्बल दोन तास चक्का जाम आंदोलन करण्यात आल्यामुळे पुणे-लातुर राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
निवेदन

Leave a Reply