October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत घरफोडी, 54 हजाराचा ऐवज लंपास

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

घरात कोणीच नसल्याची संधी साधुन चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडुन घरात प्रवेश करून रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिणे असा 54 हजाराचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार बार्शीतील भिसे प्लाॅट भागात घडला.

#संजय भगवानराव बोंदर वय 43 वर्ष, रा. भिसे प्लाॅट रिंग रोड बार्शी यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की ते ग्रामीण रुग्नालय बार्शी येथे आरोग्य सहाय्यक म्हणुन नोकरी करतात.त्यांच्या मेहुण्यांचे नाशीक येथे लग्न असल्याने ते व घरातील सर्वजन  घरास कुलुप लावुन गेले होते.
   रात्री नाशिक येथुन लग्नकार्य करुन घरी बार्शी येथे आले असता घराचा कडी कोयंडा तोडलेला दिसला. व घराचा दरवजा उघडा होता. त्यामुळे त्यांनी घरामध्ये जावुन पाहीले असता घरातील लोखंडी कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यावेळी मी कपाटामध्ये ठेवलेली रोख रक्कम 10,000/-रु. व  लहान मुलीच्या सोन्याच्या अंगठ्या, बदाम, काळ्या मण्याचे गंठण मला दिसुन आले नाही. तसेच घरातील इतर साहित्य अस्थाव्यस्थ पडलेले दिसले. त्यावरुन खात्री झाली की घराचा कडी कोयंडा तोडुन घरामध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. अज्ञात चोरटयांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply