October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत गोमांस प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

सोलापूर;

गोवंश हत्याबंदी असतानाही बेकायदेशीर पणे गोवंश हत्या करूण गोमांस जवळ बाळगल्या प्रकरणी बार्शीतील चौघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इफ्तेकार गफार सौदागर वय 26वर्ष , उबीन वारिस सौदागर वय 32 वर्ष , जिशान आण्णान सौदागर वय 27वर्ष  व वाहीब इलाईत सौदागर वय 24वर्ष सर्व रा. मंगळवार पेठ बार्शी अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

Advertisement

#धन्यकुमार राजमलजी पटवा वय 57 रा. कल्याणी बिल्डींग साधना प्रशाले समोर गवत गल्ली कुर्डुवाडी रोड बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते मानद पशुकल्याण अधिकारी महराष्ट्र राज्य म्हणुन काम करतात.  प्राण्याचे संरक्षण करणे, पाळीव प्राण्याचा छळ थांबविणे , इत्यादी कामे पाहतात.
त्यांना समजले की, धसपिंपळ गाव रोडवरील नगर पालीकेच्या जुन्या कत्तलखान्याजवळ   गोमांसाची विक्री करीत आहेत अशी बातमी मिळाल्याने त्यांनी सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता सदर ठिकाणी गोवंश जातीचे जनावरांचे सुमारे 10 इंच लांबीचे 4 शिंगे तसेच मोठ्या प्रमाणात ताजे रक्त पडलेले दिसले.त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले.मांस विक्रीसाठी घेऊन गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मंगळवार पेठ बार्शी येथील बिफ मार्केट मध्ये सदर इसमाचा शोध घेतला असता वरील इसम बिफ मार्केटमध्ये मटन विक्री करीत असताना मिळुन आले.

त्यानंतर सदर मांसा बाबत विचारपुस केली असता सदरचे मांस हे धसपिंपळ गाव रोड, येथील कत्तलखाना बार्शी येथे गोवंश जनावरे कापुन आनल्याचे सांगीतले. त्या ठिकाणी मिळुन आलेले गोवंशाचे काताडे हे कत्तल केलेले प्राण्यांचे आहे. यावरुन सदर इसमांनीच कत्तलखाना येथे जनावरे कापल्याचे निष्पन्न झाले. सदरचे मांस हे गोवंश जातीचे आहे काय या बाबत खात्री करणे करीता पशुवैद्यकिय अधिकारी बार्शी यांना कळविले आहे.बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply