बार्शीत गुटका बाळगल्याबद्दल एकावर गुन्हा

बार्शी;
गुटख्याचा साठा करूण त्याची विक्री करण्यास बंदी असतानाही 6 हजाराचा गुटखा सोबत बाळगल्यप्रकरणी बार्शीतील एकावर कारवाई करण्यात आली.
#योगेश उत्तरेश्वर गाताडे, वय 31 वर्षे, रा. सावळे सभागृहा समोर, लातूर रोड, बार्शी, असे बेकायदेशीर गुटका बाळगल्याबद्दल कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे.
#अन्न व औषध प्रशासनाच्या नसरिन तन्वीर मुजावर, वय-41 वर्षे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की
पोकॉ श्री. गोसावी, व पोकॉ श्री. ज-हाड हे बार्शी शहरामध्ये पेट्रोलिंग करीता असतना त्याना गोपनिय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, एक इसम हा तेल गिरणी चौक, बार्शी येथे लूना माटार सायकलवरुन अवैध गुटखा घेऊन येणार आहे.
पोलिस सदर ठिकाणी सापळा लावून थांबले असता रात्री 8.20 वाच्या सुमारास एक इसम एक एम. एच. 13 डीजी 4970 लुना गाडीवरुन घेवून आलेला दिसला.त्याचा माहिती प्रमाणे संशय आल्याने त्यास जागीच पकडले व त्याचे नाव गाव विचारला असता योगेश उत्तरेश्वर गाताडे, 31 वर्षे, रा. सावळे सभागृहा समोर, लातूर रोड, बार्शी, ता. बार्शी, असे सांगितले. इसमाकडून ताब्यात घेतलेल्या मुद्देमालाची पोलिस कर्मचारी व पंचासाक्षीदार यांच्या समक्ष तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा आढळून आला.याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.