February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत कोरोणा नियमाचे उल्लंघन, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केली बार्शीत कारवाई


    बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

कोरोणा महामारीच््य पार्श्वभूमीवर संसर्गजन्य रोगाचा प्रसार बार्शीत मोठ्या गतीने होत  असल्याने आज सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत धाराशिवकर , बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी व पोलीस पथक यांना सोबत घेऊन संपूर्ण बार्शी शहरांमध्ये करोणा च्या पार्श्वभूमीवर पाहणी केली.

– दरम्यान कोरोणाच्या अनुषंगाने घ्यावयाच्या खबरदारीची उल्लंघन केल्याच्या कारणावरून पांडे चौकातील एस एस मोबाईल्स हे दुकान ३० दिवसांसाठी सील करण्यात आलेले आहे. या  छोट्याशा मोबाईल दुकानांमध्ये विक्रेते व ग्राहक असे मिळून एकूण वीस जण उपस्थित होते.सामाजिक अंतर(Social distancing) देखील ठेवले नव्हते, तसेच ग्राहकांपैकी बऱ्याच जणांनी मास्कचा वापर केलेला नव्हता तसेच दुकानांमध्ये सॅनिटायझर देखील उपलब्ध ठेवलेले नव्हते. या कारणास्तव दुकान 30 दिवसांसाठी सील करण्यात आले.
त्यानंतर श्री.झेंडे यांनी सोलापूर रस्त्यावरील व्ही.के.मार्टला भेट देऊन त्या ठिकाणी मास्क न वापरलेल्या ग्राहकांवर कारवाई केली. तसेच मार्टच्या मालकांना कोरोणाच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या.
– बाजारपेठेमध्ये वीणा मास्क असणाऱ्या फळ विक्रेत्यांवर देखील त्यांनी कारवाया केल्या.

    कोरोणाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना न करणाऱ्या दुकानदार/ व्यापारी/ फळ विक्रेते तसेच नागरिकांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल. दुकानदारांनी/ व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने वेळेत बंद करावीत तसेच दुकानांमध्ये विना मास्क कोणालाही प्रवेश देऊ नये. दुकानांमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल याची खबरदारी घ्यावी तसेच मास्कचा वापर हा अनिवार्य राहील .
– हॉटेल व्यवसायिकांनी सायंकाळी आठ वाजेनंतर ग्राहकांना केवळ पार्सल सुविधा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.
– संपूर्ण बार्शी शहरामध्ये पोलीस प्रशासनाकडून वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून त्यांच्याद्वारे माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात येत आहे.  दिवसभरात शंभरपेक्षा अधिक लोकांवर मास्क वापरल्यामुळे कारवाई करण्यात आलेल्या आहेत.

Leave a Reply