June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत कपुरबा इलेक्ट्रॉनिक दुकान महिन्यासाठी सिल,मास्कचा वापर न केल्यामुळे झाली कारवाई

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

जिल्हाधिका-यांनी कोरोना रोगाचा समाजात संसर्ग वाढू नये यासाठी  मास्क चा वापर करावा सामाजिक अंतर ठेवावे त्याचबरोबर सॅनिटायझर चा वापर करावा या दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून कपूरबा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे मालक यांनी स्वतः देखील दुकानांमध्ये मास्क वापरला नाही तसेच विना मास्क ग्राहकांना दुकानांमध्ये प्रवेश दिला तसेच दुकानांमध्ये ग्राहकांसाठी सॅनिटायझर ठेवले नाही म्हणून त्यांच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे .


यापूर्वीदेखील लॉक डाऊन दरम्यान  जिल्हाधिकारी यांनी करोना संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संबंधी केलेल्या नियमावलीचे उल्लंघन केले म्हणून कपूरबा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता .

कपूरबा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानदाराच्या मालकांनी दोन वेळा  जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले म्हणून तीस दिवसांसाठी त्यांचे दुकान सील करण्यात आले आहे.

Leave a Reply