बार्शीत एकास बेदम मारहाण

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज
अंगावर पाणी येत असल्याचे सांगितल्याचा राग मनात धरून तिघांनी मिळून एकास चाकु व फळीने बेदम मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार बार्शीतील गाडेगाव रस्त्यावर म्हाडा काॅलनीत घडला.
#संजय काळु वाघेला ,महादेवी संजय वाघेला ,दिवेश संजय वाघेला सर्व रा.म्हाडा कलनी गाडेगाव रोड बार्शी अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
#संदिप लक्ष्मण विधाते वय 24वर्षे , रा. म्हाडा कॉलनी गाडेगाव रोड बार्शी यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादी व मित्र अमोल कदम असे मोटारसायकल वरुन पाणी भरणे करिता घरी आले. त्यावेळी समोर राहणारे संजय वाघेला हा घराचे भिंतीवर पाईपने पाणी मारत होता. त्यावेळी ते पाणी फिर्यादीचे अंगावर उडाल्याने ते संजय यास पाणी अंगावर उडते असे त्याला समजावुन सांगत असताना संजय याने मुलगा दिवेश यास हाक मारुन चाकु घेवुन ये संदिपचे लय झालय त्याला बघायचे आहे.असे म्हणुन शिवीगाऴी केली त्याचवेळी दिवेश याने चाकु आणुन संजयच्या हातात दिला. व दिवेशने त्याचे हातातील लाकडी फळीने फिर्यादीस पाठित मारले. त्याचवेळी संजय याने त्याचे हातातील चाकुने उजव्या दंडावर व डाव्या हाताचे पोटरिवर तसेच दंडावर मारुन जखमी केले . तेव्हा महादेवी वाघेला हिने शिवीगाळ करुन गालामध्ये चापट मारली.त्यावेळी सोबत आलेला मित्र अमोल कदम याने सोडविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यासपण संजय व दिवेश यांनी शिवीगाऴी केली. आता संजय यास सोडत नाही असे म्हणुन दिवेश हा लाकडी फळी घेवुन मारण्यास येवु लागल्याने फिर्यादी घाबरुन घरामध्ये पळुन गेले.त्यावेळी दिनेश याने त्याचे हातातील फळीने खिडकीची काच व घरासमोरिल झाडांचे कुंड्या फोडुन शिवीगाऴी करत त्याचे घरात निघुन गेला.
बार्शी शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.