बार्शीत एकाच रात्रीत तिन घरे फोडली

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज
घरातील सर्व जन बाहेरगावी गेल्याची संधी साधुन चोरट्यांनी ग्रामसेवकाच्या घराचा कडी कोयंडा तोडुण घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार बार्शी शहरातील उपळाई रस्त्यावरील शेंडगे प्लाॅट मध्ये घडला.
# राहुल गरड रा.पांगरी ता.बार्शी हल्ली शेंडगे प्लाॅट यांनी याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीत म्हटले आहे की ते व कुटुंबीय दिवाळी सनानिमित्त पांगरी गावी गेले होते. फिर्यादी हे घरी आले असता घराचा कडी कोयंडा तोडलेला असल्याचे दिसुन आले.त्यांनी घर उघडण्याचा प्रयत्न केला असता घराला आतुन कडी लावून चोरी केल्याचे दिसून आले. चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले रोख बारा हजार रुपये व सोन्याची नथ असा पंधरा हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. चोरटे चोरी करूण घराच्या पाठीमागील दरवाजाने बाहेर पडले.चोरट्यांनी गरड यांच्या घराबरोबरच ईतर तिन घरातही चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला.
याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलिस हवालदार सय्यद हे करत आहेत.