October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत अभाविप च्या वतीने महाविद्यालये सुरू करण्यासाठी आंदोलन

बार्शी;-

अभाविप बार्शी शाखेने श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी च्या समोर लवकरात लवकर महाविद्यालय सुरू करण्यात यावे तसेच ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे सरकारच्या सर्व नियमांचे पालन करून ज्या पद्धतीने पाचवी ते आठवी तसेच अकरावी व बारावीचे महाविद्यालय सुरू करण्यात आलेले आहे त्याच पार्श्वभूमीवर ती राज्यातील सर्व सीनियर महाविद्यालय राज्य सरकारने लवकरात लवकर सुरू करावे यासाठी विद्यार्थी परिषदेने राज्यातील सर्व प्राचार्यांना महाविद्यालय उघडण्यासाठी निवेदन दिले आहे.

अखिल भारतीय  विद्यार्थी परिषदेच्या वतीने महाविद्यालय उघडण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. बार्शी मध्ये श्री शिवाजी महाविद्यालय व बीपी सुलाखे कॉमर्स कॉलेज चे प्राचार्य यांना ही निवेदन देण्यात आले शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थी परिषदेचे शेकडो कार्यकर्ते एकत्र येऊन घोषणा देऊन त्यांनी प्राचार्यांना निवेदन दिले यावेळी बोलताना अभिषेक खाडे यांनी हे सरकार झोपेचे सोंग घेत आहे सरकारच्या या सोंगामुळे विद्यार्थ्यांच्या अतोनात नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी विद्यार्थी परिषद यापेक्षाही अजून तीव्र अशा पद्धतीच्या आंदोलन करेल असा इशारा दिला यावेळी विद्यार्थी परिषद बार्शी तालुका अध्यक्ष तात्यासाहेब घावटे शहर मंत्री अभिषेक खाडे, सहमंत्री आकांक्षा देशपांडे, अभिषेक कुलकर्णी ,लखन भंडारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply