October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत अज्ञात दुचाकीच्या धडकेत वृद्ध जखमी

बार्शी ;
व्यायाम करूण आपल्या सायकलवरूण घराकडे परत जाणा-या सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनिअरला भरधाव वेगातील अज्ञात दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्यामुळे वृद्ध जखमी झाल्याचा प्रकार बार्शीतील अलिपुर रस्त्यावर घडला.

Advertisement

#किसन चंद्रहर जाधव वय69 वर्षे ,रा.सुदर्शन बंगला पोलीस ग्राऊंड शिवाजीनगर बार्शी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की ते नेहमीप्रमाणे सायकलवरुन अहिल्याबाई होळकर बागेत व्यायाम करणेसाठी गेले होते.व्यायाम करुन परत सायकलवरुन ते घराकडे जात असताना अलिपुर रोडवर तलाठी कार्यालयाचे जवळ  अलिपुर गावाकडुन एक मोटार सायकलस्वार वेगात राँग साईडला येवुन त्यांच्या सायकलला जोरात धडक दिला. त्यामुळे ते सायकलसह रोडवर पडले. तसेच धडक दिलेला मोटार सायकलस्वार ही सायकल पासुन जवळ त्याचे मोटारसायकलसह रोडवर पडला. अपघात झाल्याचे पाहुन आजुबाजुचे लोक तेथे जमा झाले.त्यापैकी काही लोकांनी फिर्यादी जखमी अवस्थेत उठवुन बसविले त्यानंतर त्यांना सुविधा हॉस्पिटल मध्ये आणुन उपचारास दाखल केले.फिर्यादीचा मुलगा घटनास्थळी येण्याअगोदरच  धडक दिलेला मोटार सायकलस्वार तेथुन त्याची मोटारसायकल घेवुन पळुन गेला.त्याने दिलेल्या धडकेमुळे  उजवे पायास नडगीस जखम झाली असुन तसेच गुडघ्याजवळ फ्रक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.  धडक दिल्यानंतर लागलेल्या माराचे दुखण्यामुळे मी धडक दिलेल्या मोटारसायकलचा नंबर पाहिला नाही परंतु मी मोटारसायकल स्वारास पाहिले असुन तो 18ते20 वर्षे वयाचा मुलगा आहे त्यास मी तो समोर आल्यास ओळखतो. घडलेप्रकाराबाबत अनोळखी मोटारसायकल स्वाराच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply