June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तीन कृषी कायदे व वीज बिलांची होळी

बार्शी ;महाराष्ट्र स्पीड न्युज
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने  बावी (आ) ता.बार्शी येथे तीन काळ्या कृषी कायद्यांची व सोबतच वीज बिलांची होळी करण्यात आली.  कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाने यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी  प्रवीण मस्तुद म्हणाले, अखिल भारतीय किसान सभेची लढाई ही वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात नसून सरकारच्या विरोधामध्ये आहे, सरकारने तातडीने शेतकऱ्यांची वीज बिले माफ केली पाहिजेत सोबतच केंद्राचे तीन काळे कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याने तातडीने  मागे घ्यायला पाहिजेत यासाठी हे आंदोलन आम्ही करीत आहोत.

यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे  लहू आगलावे,  प्रवीण मस्तुद,  अनिरुद्ध नखाते, पिंटू लोंढे, अण्णा उंबरे, भालचंद्र आगलावे,  पवन अहिरे, सुयश शितोळे, अविराज चांदणे, भालचंद्र आगलावे, लक्ष्मण काळे, अंकुश आगलावे, प्रसाद मीठे, रवी लोंढे, रावसाहेब आगलावे, चंद्रकांत उंबरे, सुरेश लोंढे आदी उपस्थित होते.

Leave a Reply