बार्शीतील श्री.वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयास सॅनिटायजर स्टँड आणि थर्मोमीटर गन भेट

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी येथील श्री.वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयास लायन्स क्लब बार्शी रॉयलच्या वतीने सॅनिटायजर स्टँड आणि थर्मोमीटर गन कायमस्वरूपी भेट देण्यात आली.
बार्शी शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात नि भव्य इमारतीत असणाऱ्या श्री.वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयाचे बार्शीच्या सांस्कृतिक इतिहासात मोलाचे नि महत्वाचे योगदान आहे.गेल्या ८१ वर्षापासून अखंड नि अविरतपणे हे वाचनालय लोकप्रबोधन,लोकशिक्षण,समाजजागृती बरोबरचं शहर आणि परिसरातील अबालवृद्धांमध्ये वाचनसंस्कार नि वाचनसंस्कृती रुजविण्याचे कार्य करीत आहे.सध्याच्या कोवीड १९ पार्श्वभूमीवर तेथे येणाऱ्या सभासद आणि वाचकांच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने एक सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लब बार्शी रॉयलने हे साहित्य भेट दिले आहे.यावेळी लायन्सच्या अध्यक्षा सीमा काळे,सेक्रेटरी सुजाता मुथा,अपर्णा शिराळ,वर्षा चांगभले, हेमल दोशी,प्रांजल काळे आदी उपस्थित होते.तर प्रमख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक विनोद गायकवाड हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन वाचनालयाचे संचालक ॲड.दिनेश श्रीश्रीमाळ यांनी केले.
सदरचे साहित्य स्विकारुन आम्हाला संधी दिलेबद्दल लायन्सच्या वतीने ला.सौ सुजाता मुथा यांनी वाचनालयाचे आभार मानत भविष्यातही वाचनालयाच्या विविध उपक्रमास सहकार्य करु असे सांगितले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल सुरेश यादव,सहाय्यक ग्रंथपाल सुरेखा कुलकर्णी,लिपिक विराज पतंगे यांनी परिश्रम घेतले.