November 29, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीतील पॉलिटेक्निक कॉलेज मधील कोरोना विलगिकरण कक्षात एकाची आत्महत्या

बार्शी :
बार्शीतील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे पॉलिटेक्निक कॉलेज येथे असलेल्या कोरोना विलगिकरण कक्षात एका व्यक्तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज मंगळवारी दि.६ सकाळी उघडकीस आली.

गळफास घेऊन आत्महत्या केलेली व्यक्ती चिखर्डे या गावची असून नाव उमेश भागवत कोंढारे वय-३७ वर्षे असे नाव आहे.काही दिवसांपूर्वी कोंढारे आणि त्यांच्या कुटुंबातील आई,पत्नी आणि दोन मुले कोरोना पॉझिटिव्ह आले होते.त्यामुळे त्यांना बार्शीतील पॉलिटेक्निक येथे असलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

आज पहाटे फाशी घेतल्याचे तेथील कर्मचा-यांच्या समोर आले.त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात कळविले. दरम्यान अद्याप फाशी कशामुळे घेतली त्याचे नेमके कारण समोर आलेले नाही.मात्र कोरोना या आजाराला कंटाळूनच कोंढारे यांनी फाशी घेतल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply