February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीतील गणेश तलावात अज्ञात वृद्ध महिलेचा बुडून मृत्यु

सोलापूर;-महाराष्ट्र स्पीड न्युज

बार्शी येथील गणेश तलावात अज्ञात वृद्ध महिलेचा बुडून मृत्यु झाला आहे. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी #अग्निशमन विभागाला दिल्याने तात्काळ पथक तेथे दाखल झाले यातील सुपरवायझर विठ्ठल पाडुळे यांनी पोलीस ठाण्यास खबर दिली.

सदरची अज्ञात मृत महिला ही अंदाजे ५५ ते ६० वयाची आहे. तिच्या बाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसेच या मृत महिले बाबत काहीही माहिती मिळाल्यास बार्शी शहर पोलीस ठाण्यास संपर्क साधावा,
असे तपास अधिकारी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे एएसआय भांगे यांनी आवाहन केले आहे.

शहरातील मध्य वस्तीत आसलेला हा गणेश तलाव नेहमीच कोणत्याना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. निवडणुकीत तर हा महत्वाचा मुद्दादेखील असतो, परंतु याच्या सुरक्षेसाठी मात्र पालिका प्रशासन उदासीन आहे. गणेश तलावात सतत आत्महत्या होत असल्याने तलाव चर्चेत आला आहे. या कडे प्रशासनाने वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे.

Leave a Reply