June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीतील उडान फाऊंडेशनच्या वतीने आठ दिवसांसाठी रुग्ण वाहिका मोफत


बार्शी

शिवजयंती निमित्त बार्शीतील उडान फाऊंडेशनच्या वतीने आठ दिवसांसाठी रुग्ण वाहिका मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला असुन लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.

शाहीर अमर चौक येथील उडान फाऊंडेशनच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. लॉकडाऊन काळात काम करत असताना रूग्णवाहिकेची कमतरता भासल्याने उडान फाऊंडेशन ने रुग्ण वाहिका खरेदी करण्याच्या निर्णय घेतला व त्याला  मुर्त स्वरूप प्राप्त झाले. बार्शी शहरामध्ये मागील ५ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करत असलेली मुस्लीम मावळ्यांची उडान फाउंडेशन ही संघटना या संघटनेने शिवछत्रपतीचा आदर्श घेऊन प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उड़ान फाऊंडेशनने शिवजयंती निमित्त आपल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले. तसेच समाजातील गरजू लोकांना पूढील आठ दिवस पूर्णपणे मोफत देऊन शिवजंयती वेगळ्या पद्धतीने साजरी करत सबंध महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण केला. या उदात्त संकल्पनेतून सर्वासाठी ना नफा ना तोटा तत्वावर माफक दरात सर्वांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिलेली आहे.

या कोरोना काळात वैद्यकीय सेवेतून एक प्रकारे समाजाची सेवा करणारे वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. अमित पडवळ, डॉ. संदीप पाटील, डॉ. अमृतराज जाधव, डॉ. मौला शेख, डॉ. अंगारशा च प्रसिध्द उद्योजक हाजी इक्बाल पटेल, जय शिवराय प्रतिष्ठांचे अध्यक्ष विजय राऊत, छत्रपती गुपचे अध्यक्ष अजय पाटील, अॅड. अविनाश जाधव, गणेश नान्नजकर, किरण कोकाटे, कृष्णा उपळकर आदी मान्यवरांचा उपस्थीतीत हा कौतुकास्पद कार्यक्रम संपन्न झाला.

सुत्र संचालन संघटनेचे सचिव जमिल खान व आभार  शब्यीर वस्ताद यांनी केली. कार्यक्रमासाठी अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष जाफर शेख, इलियास शेख, सल्लागार युनूस शेख, कार्य अध्यक्ष शकिल मुलाणी, खजिनदार शोएब काझी, सदस्य साजन शेख मोहरसीन पताण, रियाज बागवान, राजू शिकलकर, अॅड, रियाज़ शेख, रॉनी सय्यद, मोईन नाईकवारडी, इक्वाल शेख, इरफान बागवान, जिलानी शेख, मुन्ना बागवान, अयूब शेख, मुज़म्मिल जावडेकर, तौसिफ बागवान, वसिम मलाणी, जमिर तांबोळी, सादीक काझी, अल्ताफ शेख, मोहसीन मलीक, एजाज शेख, बाबा शेख, जावेद शेख, शाहीद शेख आदीनी परिक्षण घेतले.

Leave a Reply