September 27, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीतील आझाद चौकात अज्ञाताने पेटवली दुचाकी,पती पत्नी जखमी..

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज
अज्ञात ईसमाने घरासमोरील दुचाकी पेटवुन दिल्यामुळे झालेल्या स्फोटात पती पत्नी जखमी झाल्याचा प्रकार बार्शीतील खुडे बोळात घडला.

Advertisement

#रामचंद्र जगन्नाथ ढोले वय-44 वर्ष व ज्योती रामचंद्र ढोले वय-35 .रा.1801 खूडे बोळ आझाद चौक बार्शी अशी जखमी पती पत्नीची नावे आहेत.

ते खाजगी कंपनीत मँनेजर या पदावर काम करतात .  कंपनीतर्फे होंडा युनीकॉर्न मोटरसायकल नंMH13/Cx3423 ही वापरणेसाठी देण्यात आली असुन तिचा वापर मी स्व:ता करतात.

नेहमी प्रमाणे रात्री08/00 वा.चे.सुमारास कंपनी मधुन कामावरुन घरी आलो त्यावेळी  होंडा युनीकॉर्न मोटरसायकल नंMH13/Cx3423 ही घराचे दरवाजाचे पायरी जवळ हँण्डल लॉक करुन पार्कीगला लावली होती. त्यानंतर मी व घरातील इतर लोक जेवणखाण करुन झोपी गेलो दरम्यान रात्रो 02/00 वा.चे सुमारास  झोपमोड झाली व काहातरी जळालेचा व पेटवलेचा आवाज येत असल्याने मी ऊठुन पत्नी ज्योती हिचे सोबत घराचे दरवाज्याचे जवळ आलो. त्यावेळी दरवाज्याचे फटीमधुन घराचे दरवाज्या लगत जवळच आग लागलेचे दिसलेने मी दरवाज्या उघडला असताना पाहिले तो पायरी लगत जवळच पार्कीगला लावलेली मोटरसायकल नंMH13/cx3423 हीला आग लागलेली होती मोटारसायकलचे सीट व लगतचे फायबर स्पेअर पार्ट जळत होते मला पुढील काही समजणेच्या आत मोटारसायकलचे पेट्रोल टाकीचे झाकन उडाले व पेट्रोल टाकीचा स्फोट झाला.घडले प्रकारामध्ये पेट्रोल अंगावर उडुन भाजल्याने माझे डावा हात,खांदा व मानेववर भाजुन जखमा झाले होते. तसेचे पत्नी ज्योती हिचे उजवा हात चेहरा व पाटीवर व ठिक ठिकाणी भाजुन जखमा झाल्या आहेत.त्यानंतर शेजारी राहणारे भाऊ भालचंद्र ढोले, संतोष खूडे व विद्या खूडे यांनी आवाज ऐकुन आमचे मदतीला आले. त्यांनी घरातील पाणी टाकुन मोटारसायकलला लागलेली आग विझवली. तसेच झाले प्रकारामध्ये मी व पत्नी ज्योती भाजुन जखमी झालेने आम्हाला उपचारासाठी हिरेमठ हॉस्पिटल येथे दाखल केले असुन सध्या आमचेवर उपचार चालु आहेत.  हा प्रकार कोणीतरी आज्ञात इसमाने हेतु पुर्वक  त्रास देण्याचे उद्देशाने मोटारसायकल पेटवुन दिल्याने घडला.
बार्शी शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply