June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीच्या सुलाखे इंग्लिश मेडियम स्कूलचा आदित्य गोंडाळ आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात पाचवा तर तालुक्यात प्रथम

सोलापूर;-महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

बार्शीतील ‘सुलाखे इंग्लिश मेडियम स्कूलचा विद्यार्थी कु. आदित्य शांतीभुषण गोंडाळ याने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा इंग्रजी माध्यमातून दिलेली होती. या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इंग्रजी माध्यमातून गुणवत्ता यादीमध्ये जिल्ह्यामध्ये पाचवा क्रमांक पटकवला व बार्शी तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान त्याने मिळवला तसेच सन २०१६-२०१७ मध्ये पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ही असेच घवघवीत यश संपादन केलेले होते. याच्या मोठ्या यशामुळे त्याचे सर्व स्तरामधून कौतुक होत आहे. यास  अमोल कुलकर्णी, सौ. स्वाती लोखंडे व मुख्याध्यापक(प्र.) उमेश चव्हाण,मुख्याध्यापिका सौ.माया बेताळे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या त्याच्या यशाचे कौतुक व अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष  आनंद सुलाखे, सचिव अनंत कवठाळे संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी, शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी केले.

Leave a Reply