बार्शीच्या सामाजिक वनीकरण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, तालुक्यातील लाखो रूपयांची रोपे करपली

बार्शी (गणेश गोडसे)
सामाजिक वनीकरण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे बार्शी तालुक्यात लाखो रूपये खर्चुन लागवड करण्यात आलेली रोपे करपुन गेली असुन याकडे सामाजिक वनीकरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का असा प्रश्न बार्शीतील वृक्षप्रेमीमधुन विचारला जात आहे.एकीकडे शासन नैसर्गिक समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संगोपनावर खर्च करत असताना बार्शी तालुक्यात अशी दुर्दैवी स्थिती निर्माण झाल्यामुळे जनतेमधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पुणे-लातुर राज्य मार्गावर घारी-पांगरी दरम्यान दोन किलो मिटर अंतरावर लाखो रूपये खर्चून लिंब,वड,पिंपळ,सिरस आदी विविध प्रकारच्या रोपाचे राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले होते.घारी-पांगरी दरम्यानच्या दोन किलोमीटरवरील नविन रोपांसाठी तिन वर्षासाठी तब्बल तिन लाख सत्तेचाळीस हजार सातशे तिन रूपये (384703) रक्कम शासनाने पाणी,देखभाल,संरक्षण आदी कामासाठी मंजुर केले आहेत.
2019 मध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली होती. लागवडीनंतर रोपांच्या संरक्षणासाठी सुरक्षा नेट लावण्यात आले होते.दोन वर्षात सदर रोपे जोमात वाढत असताना गत अणेक महिन्यापासून या रोपाकडे सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिका-यांसह कर्मचा-यांकडुण कानाडोळा झाल्यामुळे अणेक झाडे मुळापासुन वाळुन गेली असल्याचे हृदयद्रावक दृष्य निर्माण झाले आहे.या झाडांना पाणीच न दिल्यामुळे रोपे वाळुन जात आहेत.
या लागवड करण्यात आलेल्या झाडाची देखभाल सामाजिक वनीकरण विभागाने करणे आवश्यक आहे.तसेच तिन वर्ष देखभाल करणे गरजेचे असताना रोपाकाडे दुर्लक्ष केले जात आहे.एकंदरीत अशीच परिस्थिती बार्शी तालुक्यात लागवड करण्यात आलेल्या इतर भागातील रोपांची आहे.बार्शी-उस्मानाबाद मार्गावरही असिच स्थिती असल्याचे वृत्ता आहे.देखरेखीसाठी ठेवण्यात आलेली माणसेही यापुर्वीच काढुण टाकण्यात आली असल्यामुळे सर्व रोपे राम भरोसे आहेत.तरी संबंधित वरिष्ठ अधिका-यांनी याकडे लक्ष केंद्रित करून रोपांना पाणी देण्याबाबत व्यवस्था करावी अशी जनतेची मागणी आहे.
प्रतिक्रिया;-
#निजाम मुलाणी;- सामाजिक वनीकरण)
रोपांसाठी मंजुर असलेले सर्व पैसै अद्याप आम्हाला मिळालेले नाहीत.त्यामुळे पाणी देण्यात अडचणी उद्भवतात.