October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीचे दुय्यम कारागृह समस्यांच्या विळख्यात,बार्शीचा सार्वजनिक बांधकाम विभाग घेतोय गांधारीची भुमिका

बार्शी :(गणेश गोडसे)
वारंवार लेखी तोंडी विनंती करूनही बार्शीच्या सार्वजनिक बांधकाम उप विभागाच्या दुर्लक्षामुळे बार्शीतील दुय्यम कारागृहच विविध समस्यांच्या विळख्यात सापडले असुन कारागृहाच्या दुरूस्त्या करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यामुळे कैद्यांना दुर्गंधीसह डबल शिक्षा भोगावी लागत आहे..सार्वजनिक बांधकाम बार्शी विभागाच्या कार्यपद्धतीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
  याबाबत अधिक माहीती अशी की बार्शीतील
दुय्यम कारागृहातील स्वच्छता गृहे व सांडपाण्याची व्यवस्था ना दुरुस्त असल्यामुळे तेथे
ठेवलेल्या बंद्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छता गृहाचे पाईप लाईन (आऊट लाईन) खराब झाल्यामुळे कोठडीतील स्वच्छतागृहाचे सांडपाणी तेथे साठून राहत आहे. तसेच कारागृहाचे सेप्टी टॅकही नादुरुस्त व खराब झालेले असल्यामुळे
त्यातील पाणी कारागृहाच्या सभोवती साठुन परिसरात दुर्गधी युक्त वातावरण निर्माण होत आहे. परिणामी कोठडीतील बंद्याचे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारागृहाचे खिडक्यासोबत असलेले संरक्षक जाळीही कमकुवत झाली असल्याचे दिसुन येते. या संदर्भात कारागृहात डयुटीवर असलेले पोलीस गार्ड यांनी
कारागृहाचे जाळया मजबुत बसवुन घेणेबाबत जेल प्रशासनास विनंती केली आहे. कारागृहामध्ये या
अडचणींमुळे नविन येणारे बंदी ठेवण्यास अडचणी निर्माण होत आहेत. सन २०१५ पासुन कारागृहास
आवश्यक असलेली रंगरंगोटी देखील केलेली नाही.
या बाबत दुय्यम कारागृहाचे सबजेलर यांना विचारणा केली असता मागील सन २०१८ पासुन ते
२०२१ पर्यंत सार्वजनिक बांधकाम उप विभाग बार्शी यांना वरील दुरुस्ती बाबत पत्रव्यवहार केला आहे मात्र तरीही बार्शीचा सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर कोणतीच कार्यवाही अद्याप पर्यंत केली नाही.तसेच या दुरुस्ती बाबत  कार्यकारी अभियंता सा.बां. सोलापुर यांना देखील माहितीस्तव
पत्रव्यवहार केला आहे. परंतु अद्यापही या दुरुस्त्या झालेल्या नाहीत. आणखीन काही दिवस हीच परिस्थिती
राहील्यास कारागृहातील सर्व बंदी अन्य कारागृहात ना ईलाजाने हलवावे लागतील असे सबजेल
प्रशासनाकडुन बोलले जात आहे.

प्रतिक्रिया;
किरण भालेराव (सबजेलर,बार्शी);
दुरूस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागासह त्यांच्या वरिष्ठांनाही वारंवार लेखी पत्र दिले असुन दुरूस्तीबाबत कार्यवाही करावी असे कळवले आहे.

चौकट;
बार्शीत कैद्यांना मिळालेली व दुर्गंधीची अशी डबल शिक्षा भोगावी लागत आहे.

Leave a Reply