बार्शीचे आ.राजेंद्र राऊत यांना फेसबुक लाईव्ह वरूण जिवे ठार मारण्याची धमकी,पनवेलच्या एकावर बार्शीत गुन्हा

बार्शी ;
शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या विरोधात राजकारण कराल व त्यांच्या केसाला धक्का लावाल तर गाठ माझ्याशी आहे असे म्हणुन बार्शीचे आ.राजेंद्र राऊत यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
# नंदु उर्फ बाबा पाटील रा.पनवेल (मुंबई) असे जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
#प्रशांत खराडे रा.शिवाजी आखाडा,बार्शी यांनी याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
#खराडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की पाटील याने दि.3 मार्च रोजी फेसबुक लाईव्ह द्वारे बार्शीचे आ.राजेंद्र राऊत व नगरसेवक अमोल चव्हाण यांना उद्देशून मी खुप हरामी माणुस आहे.माझ्या या दाढीच्या चेह-यामागे जो चेहरा आहे तो खुप कमी लोक ओळखतात,तुम्ही जर मुंबईला आलेले समजले तर तुम्हाला मुंबई तुन बाहेर पडु देणार नाही.कारण माझे खुप भाई लोकांशी संबंध आहेत.भाऊसाहेब आंधळकर यांच्या विरोधात आपण राजकारण कराल व त्यांच्या केसाला जरी धक्का लावाल तर गाठ माझ्याशी आहे.मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे माझे खुले आवाहन आहे.मी बार्शीत येऊन नंग्या तलवारी नाचवीन माझ्या विरोधात कितीही पोलीस यंत्रणा व तुमच्या कार्यकर्त्यांची यंत्रणा लावली तरी माझ्यावर याचा काहीही परिणाम होणार नाही.तुमच्या सोबत दहा पोलीस जरी ठेवले तरी काही होणार नाही असे म्हणुन तलवारीने मारण्याची भाषा करूण जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.
याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात 507 कलमांतर्गत नंदु उर्फ बाबा पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शामराव गव्हाणे हे करत आहेत.