October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

फौजदार अकॅडमीच्या वतीने 65 गरजुंना दिवाळी निमित्त नवीन कपडे

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

दारिद्रयाच्या  काळोखात राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात  प्रकाश  निर्माण करण्याचा प्रयत्न  महाराष्ट्र पोलिसांकडून करण्यात आला.
फौजदार अकॅडमीच्या माध्यमातून राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्षबापूसाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने बार्शी व परंडा  तालुक्यातील गरीब, गरजू, भटक्या विमुक्त जमाती, दलीत वस्ती ,ऊसतोड मजुुरांचे पाल आदी ठिकाणी जावून तेथील 65 मुला-मुलींना नवीन कपडे देण्यात आले.दीपावली सर्वसामान्य लोकांनी आनंदाने उत्साहाने साजरी करावी, हा या कार्यामागे उद्देश संबंधितांचा होता.कपडे वाटप करताना लक्ष्मण शेळके, लहू पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply