October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून बालदिन व दिवाळी साजरी…बालदिना निमित्त  “मेरा बचपन मेरा अधिकार”… या अभियानाला सुरुवात…..

मुलांना नवीन कपडे,चप्पल, फराळ, देऊन 300 वंचित मुलांची दिवाळी  केली गोड करत बालदिन व दिवाळी साजरी……
        बालदिनाच्या निमित्त रस्त्यावर भिक्षा मागणाऱ्या मुलांना  शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रार्थना फाऊंडेशन चा प्रयत्न…..

Advertisement

     आपण एकीकडे बालदिन व दिवाळी साजरी करताना आज कित्तेक मुलं आपल्याला शिक्षण सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर भीक मागताना दिसतात.त्यांच्या अधिकारापासून ते वंचित राहत आहेत.अश्याच शेकडो मुलांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणण्याचा प्रयत्न प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून केला जात आहे.जर वर्षी बालदिनाच्या निमित्त रॅली काढून भिक्षा मुक्ती अभियान राबवले जाते व पटनाट्याच्या माध्यमातून भीक न देता मुलांना शिक्षण दिले पाहिजे हा संदेश देऊन जनजागृती केली जाते.
        या वर्षी योगायोगाने बालदिन आणि दिवाळी एकत्र आली आहे त्या निमित्त प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून *”मेरा बचपन मेरा अधिकार”*…. या अभियानाला सुरुवात करू भिक्षा मागणाऱ्या,वंचित,उपेक्षित घटकातील 300 मुलांना दिवाळीच्या निमित्त नवीन कपडे, चप्पल,फराळ,तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम घेऊन बालदिन व दिवाळी साजरी करण्यात आली.
      प्रत्येक मुलाला स्वतःच बालपण स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे पण आज कित्येक मुलांच बालपण रस्त्यावर भीक मागण्यात कोमेजत आहे,कित्तेक मूल फुटपाथवर राहून आपण बालपण जगत आहेत.शेकडो मूल रोजगारासाठी आई वडिलांनाच्या सोबत शिक्षण सोडून स्थलांतर करत आहेत,कित्तेक मूल वाममार्गाला जाऊन बालगुन्हेगार, बालकामगार होत आहे.
     प्रत्येक मुलाला जगण्याचा,शिक्षणाचा,समाजात ताठ मानेने जाण्याचा, आनंदाने खेळण्याचा-बागडण्याचा,चांगली कपडे,चप्पल घालण्याचा,चांगल्या घरात राहण्याचा,सामाजिक वातावरणात जगण्याचा आणि इतर अधिकार आहेत पण आज कित्तेक मूल या अधिकारापासून वंचित आहेत.अश्याच मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून होत आहे.
     बालदिनाच्या निमित्त रस्त्यावर भिक्षा मागणाऱ्या मुलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.याच अनुषंगाने मुलांना दिवाळीचा फराळ आणि शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या पालकांचे समुपदेशन करून त्यांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत यंदाचा बालदिन व दिवाळी साजरी केल्याचे मत संस्थेच्या सचिव अनु मोहिते यांनी व्यक्त केले.
     कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त डॉ.वैशाली कडुकर,भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत नामनिर्देशित केलेलं आयुर्वेद तज्ञ  शिवरत्न शेटे,जिल्हा बालग्रह तपासणी अधिकारी समीर सय्यद,उद्योजक केतन व्होरा,नगरसेवक गुरुषांत धुत्तरंगावकर,नरेन्द्र गंभीरे,भाग्यश्री वठारे, काशीनाथ भतगुणकी,आदी मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोविंद तिरणगरी,सचिन जगताप,सिद्रय्या पाटील,मुकेश जामदार,रोहित कोळेकर,ओम साळुंखे,प्रसाद बिराजदार आदींनी परिश्रम घेतले

■ चौकट:- समाजातल्या वंचित उपेशी,भिक्षा मागणाऱ्या मुलांना भीक न देता शिक्षण, संस्कार देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे प्रत्येकाचे काम आहे.या कामी सोलापूर मध्ये प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून कार्य केले जाते त्या साठी समाजातील प्रत्येकाने जमेल तसा हातभार लावणं गरजेचं आहे.
डॉ.वैशाली कडुकर
पोलीस उपायुक्त, सोलापूर शहर

Leave a Reply