March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्टची गणेश जयंती साध्या पद्धतीने

बार्शी;

गत 28 वर्षांपासून हजारो बार्शीकरांच्या उपस्थितीत भरगच्च कार्यक्रमांच्या माध्यमातून होत असलेली प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्टची गणेश जयंती यंदा अत्यंत  साधेपणाने होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष कमलेश मेहता यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. कमलेश मेहता यांनी गर्दी टाळण्यासाठी यंदा महाप्रसाद ऐवजी  बुंदीच्या प्रसाद पाकिटांचे वाटप कोरोनाचे सुरक्षिततेचे नियम पाळून होणार आहे. परंपरानुसार होणारे धार्मिक विधी यात दिनांक 15 रोजी पहाटेचे काकडा आरती 108 लिटर दुधाचा अभिषेक दुपारी 12 वा.5 मी.महाआरती व जन्मोत्सव ,रात्री ची महाआरती दिनांक 16 रोजी सकाळी 4 च्या सुमारास मंडळातील सदस्यांच्या विवाहित मुलींच्या दाम्पत्यांच्या हस्ते पालखी पूजन  आणि नियमित रस्त्याऐवजी परिसरातच पालखीची साध्या पद्धतीने   मिरवणूक आदी कार्यक्रम होत आहेत.  या वेळी बंडू माने,बसवेश्वर गाढवे, प्रमोद भंडारी, हर्षल रसाळ, अमोल येवनकर, राजु मेहता हे उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply