June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

प्रभू श्रीराम मंदिराच्या निधी समर्पण अभियानास बार्शीत सुरुवात

बार्शी;

  अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे भव्य मंदीर निर्माण करण्याचे कार्य श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासामारफत सुरु झाले आहे. प्रभू श्रीरामाच्या मंदिराकरिता सामान्य जनतेचा भावनिक सहभाग असावा या उद्देशाने न्यासातरफे घरोघरी संपर्क करुन निधी समर्पणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शुक्रवारी १५ जानेवारी रोजी कसबा पेठेतील समर्थ व्यायाम शाळेतील रा. स्व. संघाच्या कार्यालयात निधी समर्पणाच्या कार्यालयाचे उद्घाटन करुन निधी समर्पणाच्या कार्यास सुरुवात करण्यात आली. नागणे प्लाट, परांडा रोड आदी भागात निधी समर्पणाच्या कार्यास सुरुवात करण्यात आली. यास लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी दिनकर (प्रदीप) भगवान सापनाईकर यांनी २५,०००/- रुपये,  हरीष कुलकर्णी यांनी ११,०००/-, श्री कार्पोरेशन यांनी ५,०००/- व बापू रोहिणकर यांनी ५,०००/- रुपये असे धनादेशाद्वारे जमा केले. तसेच रोख स्वरुपातही रक्कम जमा झाली असून शुक्रवारी जवळपास ८४,५२०/- इतका निधी समर्पण झाला आहे. या दात्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Advertisement

यासाठी रा. स्व. संघाचे तालुका कार्यवाह मोहनजी श्रीरामे, सहकार्यवाह तुषार महाजन, ज्येष्ठ स्वयंसेवक पी.व्ही. कुलकर्णी, व्ही.एस. कुलकर्णी, सुरेशभाऊ हालमे, राजन बंडेवार, अनिल खजानदार, सूर्यकांत देशमुख, जितेंद्र मोरे, सुधाकर नारकर, गजानन कुलकर्णी, व्यंकटेश कुलकर्णी, असि्मत कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. 

शहर व तालुक्यातील विविध भागात निधी समर्पण अभियानाचे काम दररोज महिनाभर चालणार आहे. तरी श्रीराम भक्तांनी यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन न्यासातरफे करण्यात आले आहे.

Leave a Reply