प्रजासत्ताक दिनी दिव्यांग शाळा कर्मचार्यांचे विविध मागण्यांसाठी बार्शी तहसील समोर आमरण उपोषण

बार्शी;- महाराष्ट्र स्पीड न्युज
महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग शाळेतील कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे
सातव्या वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी महाराष्ट्रातील विविध दिव्यांग शाळा कर्मचारी संघटना धरणे व आंदोलने करीत आहेत परंतू त्यांच्या आंदोलनाची व मागण्यांची पुर्तता शासन करीत नसल्याने बार्शी येथील दिव्यांग शाळा कर्मचारी व माजी नगरसेवक राजू कांतीलाल घोलप यांनी आपल्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांसोबत दि. 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनी दिव्यांग शाळा कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बार्शी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे लेखी निवेदन शासनाच्या संबंधित विभागास दिले आहे.
दिलेल्या निवेदनात खालील प्रमाणे मागण्या करण्यात आलेल्या आहेत. सातवा वेतन आयोग प्रमाणे वेतन मिळावे, 123 शाळा मधील प्रलंबित प्रश्न सोडवावेत, कंत्राटी कर्मचारी यांना पूर्ण वेतन मिळावे, बंद पडलेल्या शाळा मधील शिक्षक व कर्मचारी यांचे वेतन सुरु करा व त्यांचे समायोजन करावे, नुतनीकरणातील जाचक अटी रद्द कराव्यात, कायम विना अनुदानित शाळांना त्वरीत अनुदान द्यावे, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना चालू करण्यात यावी