March 30, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाणारा सन्मान म्हणजे बार्शीचा युगदर्शक आयकॉन पुरस्कार- डॉ. बाळसराफ

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला, त्यांचे अभिनंदन करत विकृतीकडून प्रकृती अन् प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाणारे मंडळी ही खऱ्या अर्थाने या पुरस्काराची मानकरी आहे. सिद्धीपेक्षा जास्त प्रसिद्धीवर जोर असतो, मिशनपेक्षा जास्त कमिशनवर जोर असतो. समाजात सुस्त, त्रस्त, व्यस्त आणि मस्त अशा चार प्रकारचे लोक असतात. या चार प्रकारांतील शेवटचा प्रकार म्हणजे मस्त असलेले लोक म्हणजे आज ज्यांना पुरस्कार मिळाला ते आहेत कारण, या पुरस्कारकर्त्यांनी आपल्या क्षेत्रात झेप घेताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन यश मिळवलंय. अस प्रतिपादन सलग आठव्या वर्षातील युगदर्शक आयकॉन पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य डॉक्टर दत्तात्रय बाळसराफ यांनी केले.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री दिलीप सोपल, स्नेहल बाळसराफ, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे बार्शी नगरपरिषद उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले प्रतिष्ठानचे , माधवबाग चे पवन कोळी, उद्योजक राहुल कोंढारे, युग्दर्शक प्रतिष्ठाण अध्यक्ष नितीन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावर्षी पुरस्काराच्या सलग आठव्या सोहळ्यात अकरा आयकॉन पुरस्कार वितरित करण्यात आले. यात जीवन गौरव – तुकाराम पाडे, महसूल आयकॉन – उस्मानाबाद निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सोलापूर जिल्हा आयकॉन – अणुजीव शास्त्रज्ञ संतोष जठार, राज्यस्तररीय पोलीस आयकॉन – पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, बार्शी युवा आयकॉन – कौस्तुभ(आण्णा) पेठकर, उद्योजक आयकॉन – वसीम पठाण, सरपंच आयकॉन – पंडीत मिरगणे, महिला आयकॉन – अॅड. राजश्री तलवाड-डमरे, क्रिडा आयकॉन – प्रमोद माळी, वैद्यकीय सेवा आयकॉन – सुविधा हॉसिपटल, पत्रकार आयकॉन – मयुर गलांडे आदी समाजधुरीनाना आयकॉन पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सर्व आयकॉन पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे कामाचे कौतुक करत युगदर्शक प्रतिष्ठान कडे गुणग्राहकता आहे त्यामुळे समाजातील निवडून काढलेली व्यक्तींना हा आयकॉन म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची पावती आहे असे प्रतिपादन केले. यावेळी आपल्या प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन भोसले यांनी सांगितले की , आयकॉन सोहळा हा आता लोकोत्सव बनत चालला असून पुरस्काराने आठ वर्ष पूर्ण करताना बार्शीकर यांनी दिलेली साथ ही कायम स्मरणात राहणारे आहे आणि बार्शी च्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी या पुरस्कार सोहळ्याचा उल्लेख होणार आहे असे सांगितले.

हा आयकॉन सोहळा यशस्वी करण्यासाठी सुधीर खाडे, सावता परिषद अध्यक्ष दिनेश नाळे, माऊली नाळे, शितल नाळे, पोलीस पाटील महेंद्र पाटील, सचिन गायकवाड, श्रीकृष्ण उपळकर, नरेश ठाकूर, उदय पोतदार,
जाधवर, गिरीष कुलकर्णी, गुरु साखरे, किरण भिसे, विशाल नवले, गणेश मोरे, गणेश शिंदे, पंडीत शिंदे, विशाल भोसले आदींनी परिश्रम घेतले आयकॉन सोहळ्याचे आभार प्रदर्शन सुधीर खाडे यांनी केले तर सूत्रसंचालन अपर्णा दळवी यांनी केले

Leave a Reply