पोस्ट देणार हयातीचा दाखला

सोलापूर;- महाराष्ट्र स्पीड न्युज
सेवानिवृत कर्मचार्यांना प्रति वर्षी आवश्यक असणारा हयातीचा दाखला देणेबाबत आता भारतीय डाक विभागाने पुढाकार घेतलेला असून पोस्ट कर्मचारी थेट संबंधितांना घरी येवून हा दाखला देणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ सेवा निवृत्त धारकांची मोठी सोय होणार आहे. याचा लाभ सर्व सेवानिवृत्त कर्मच्यार्यांनी घ्यावा अशे आवाहन बार्शी उपविभागाचे, उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांच्या वतीने करण्यात आले आहे.
केंद्र व राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचार्यांना शासनाकडून दरमहा निवृतिवेतन (पेंशन) मिळते. दरवर्षी प्रत्येक सरकारी सेवानिवृत्त कर्मचार्यांना आपल्या हयातीचा दाखला पेंशन विभागाकडे सादर करावा लागतो अन्यथा त्या महिन्यापासून संबधितांचे निवृत्तीवेतन बंद केले जाते.
खाजगी सायबर कॅफे किंवा संगणक केंद्रावरून सदरचा हयातीचा दाखला तयार करून तो संबंधीताना देण्यासाठी आत्तापर्यंत सेवानिवृत्त कर्मचार्यांना पायपिट करावी लागत होती. परंतु डाक विभागामुळे आता ही पायपिट थांबण्यास मदत होणार आहे. पोस्ट विभागाकडे सेवानिवृत्त कर्मचारी मागणी केल्यावर डाक कर्मचारी सेवानिवृत्त कर्मच्याराच्या घरी जावून त्यांच्या हयातीचा दाखला आधार कार्ड व बायोमेट्रिक यंत्राच्या सहायाने जागेवरच तयार करणार आहेत त्यामुळे सध्या कोरोंना काळात किंवा वयोमानांनुसार सेवानिवृत्त कर्मचार्यांना धावपळ करावी लागणार नाही. तसेच अधिक महितीसाठी आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसशी संबंध साधावा.
बार्शीत प्रवर अधीक्षक डाकघर सूर्यकांत पाठक यांचे मार्गदर्शनाखाली, बार्शीतील पोस्टमास्टर श्रीमती एम ए कांबळे, स.पोस्टमास्तर उल्हास सुतार, कर्मवीरनगर चे पोस्टमास्टर महेश तोष्णीवाल यांचे नियंत्रणाखाली कामकाज चालू असलेची माहिती उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यात बार्शी उपविभागात असणार्या अनेक सेवानिवृत्त कर्मचार्यांना या डाक सेवेचा फायदा होणार आहे. विशेषतः वयोमान व सध्याचा कोरोंना काळ या अडचणीमुळे वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मच्यार्यांना याचा लाभ होणार आहे. पोस्टाच्या या सेवेबद्दल पोस्ट ऑफिस व डाक कर्मचारी यांचे आभार मानतो.
अंगद बगाडे माजी एसपीएम, बार्शी उपडाकघर
पोस्ट विभागातर्फे सेवानिवृत्त कर्मच्यार्यांना हयातीचा दाखला देण्याबाबत सुविधा आपलेकडे चालू आहे. आपल्या नियमित कामाबरोबर जेष्ठ लोकांच्या तोंडावरील स्मित हास्य व त्यांचे काम झालेचे पाहून मला मानसिक समाधान व आपल्या कामाचा आनंद मिळतो.