March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पोलिसांनी खोट्या टिआरपीच रॅकेट केले उघड; दोन मराठी चॅनलच्या चालकांना केले अटक;रिपब्लिक ही चौकशीच्या फे-यात

मुंबई, 8 ऑक्टोबर : आज मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी खोट्या टीआरपीचं रॅकेट उद्ध्वस्त केल्याचं सांगितलं आहे. यामध्ये तीन वाहिन्यांचा समावेश असल्याचे समोर आले असून यामधील दोन वाहिन्यांच्या चालकांना अटक करण्यात आली आहे.

आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार ‘बॉक्स सिनेमा’ आणि ‘फक्त मराठी’ या मराठी वाहिन्याच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. ‘रिपब्लिक’ टेलिव्हिजन याचाही खोट्या टीआरपी रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे दिसून आले आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार एखादे चॅनल सुरू ठेवण्यासाठी कुटुंबाला तब्बल 300 ते 400 रुपये दिले जात होते.

टीआरपी रेटिंगमध्ये घोटाळा होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या घरांमध्ये बार्कचं मीटर लावले आहेत, त्या कुटुंबांना पैसे देऊन डेट्यामध्ये घोटाळा करण्यात आला आहे. इंग्रजीतील प्रसिद्ध रिपब्लिक टिव्हीचे प्रोमोटरही रॅकेटमध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. अखेर मुंबई पोलिसांनी खोट्या टीआरपीचं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे.

Leave a Reply