March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पुण्यात गुन्हेगारी सत्र सुरूच; डोक्यात दगड घालून केला मित्रानेच मित्राचा खून

पुणे : शहरात सध्या गुन्हेगारीची सत्र सुरूच असुन डोक्यात दगड घालून कोंढवा भागातील एकाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली असून कोंढवा परिसरात मागील दहा दिवसातला हा तीसरा खून आहे. यामुळे परिसरात भितीचं वातावरण निर्माण झाला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल रामदास धांडे (वय 22 , रा. कृष्णानगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आकाश लाला म्हस्के (वय 24, रा.कोंढवा) याच्या विरोधात कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत विठ्ठल आणि संशयित आरोपी आकाश हे एकमेकांचे मित्र होते. ते दोघे दारू पित बसले होते. त्यांच्यात दारू पिण्यावरून वाद झाले. याचे रूपांतर भांडणात झाले. रागाच्या भरात आकाशने दारूच्या नशेत विठ्ठलच्या डोक्‍यात दगड घातला. यामध्ये विठ्ठल गंभीर जखमी झाला.

Leave a Reply