पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची दोन दिवसांची परीक्षा पुढे ढकलली

सोलापुर;-
नैसर्गिक संकट आल्यामुळे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणा-या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
दि. 14 व 15 ऑक्टोबर 2020 या दोन दिवसांच्या परीक्षा नंतर घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आला आहे. अतिवृष्टी पावसाने व खंडित वीजपुरवठा या कारणाने ऑनलाइन परीक्षा देताना नेटवर्कची सतत अडचण विद्यार्थ्यांना होत आहे. यामुळे या दोन दिवसांच्या परीक्षा अनुक्रमे दि. 19 व 20 ऑक्टोबर 2020 रोजी पूर्वनियोजित वेळेनुसार होणार.
Advertisement