September 27, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पुणे विभागात 38 हजारापेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह कोरोणा रूग्ण

पुणे विभागातील 6 लाख 21 हजार 881 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 6 लाख 76 हजार 826 रुग्ण

Advertisement

पुणे, दि. 20 :- पुणे विभागातील 6 लाख 21 हजार 881 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 76 हजार 826 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 38 हजार 237 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.47 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.88 टक्के आहे.

दरम्यान अशा स्थितीत अजूनही महापालिकेचे जम्बो कोविड सेंटर आणि विलगीकरण कक्ष सेवा सुविधा सुरु होण्याचे नाव घेईनात असे चित्र आहे .

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 58 हजार 597 रुग्णांपैकी 4 लाख 16 हजार 297 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 32 हजार 882 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 418 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.05 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 90.78 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 61 हजार 737 रुग्णांपैकी 57 हजार 777 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 84 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 876 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 55 हजार 949 रुग्णांपैकी 51 हजार 867 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 195 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 887 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 417 रुग्णांपैकी 46 हजार 979 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 667 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 126 रुग्णांपैकी 48 हजार 961 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 409 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 756 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 5 हजार 725 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 5 हजार 65, सातारा जिल्ह्यात 132, सोलापूर जिल्ह्यात 279, सांगली जिल्ह्यात 186 तर कोल्हापूर जिल्ह्यात 63 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 2 हजार 409 आहे. पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 211, सातारा जिल्हयामध्ये 98, सोलापूर जिल्हयामध्ये 55, सांगली जिल्हयामध्ये 19 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 26 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 44 लाख 75 हजार 467 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 76 हजार 826 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Leave a Reply