June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पुणे येथे भारती एक्सा कंपनीच्या कार्यालयात शेतकरी संघटनेचे पिकविम्यासाठी बोंबाबोंब व ठिय्या आंदोलन

पुणे : महाराष्ट्र स्पीड न्युज

(व्हिडिओ)


राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकविमा भरपाईसाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली आज कोरोनाच्या नियमांचे पालन करत पुणे येथे ढोले पाटील मार्गावरील भारती एक्सा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयात बेमुदत बोंबाबोंब व ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. वारंवार शांततेत निवेदने देऊन व आंदोलने करून देखील शेतकऱ्यांच्या खातेवर भरपाई जमा न झाल्यामुळे आज नाविलाजाने कोरोनाच्या नियमांचे पालन करीत आंदोलन सुरू केल्याचे सांगून जोपर्यंत शेतकऱ्यांचे खातेवर पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहनार असल्याचे शंकर गायकवाड यांनी सांगितले त्यावेळी दयानंद चौधरी, मधूकर चौधरी, भारत चौधरी, गोटू पाटील, बाबा तानवडे, अक्षय मते, निलेश चौधरी, बजिरंग चौधरी, विनोद कदम, मुन्ना गवळी, समाधान कदम, भगवान चौधरी, शितल चौधरी, ज्ञानदेव गायकवाड, श्रीहरी गायकवाड, सुरज चौधरी, सिद्धू चौधरी आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply