October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पुणे येथे पिक विम्यासाठी भारती एक्सा कंपनी कार्यालयात शेतकरी संघटनेचे झोपा व मुक्काम आंदोलन

पुणे ;महाराष्ट्र स्पीड न्युज
राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकविमा भरपाईसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने  कोरोनाच्या नियमांचे पालन करत पुणे येथे ढोले पाटील मार्गावरील भारती एक्सा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयात बेमुदत झोपा व मुक्काम आंदोलन सुरू करण्यात आले. मागील आंदोलनात दहा दिवसात राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खातेवर रकमा सोडण्याचे लेखी आश्वासन दिले होते परंतु अजूनही अनेक शेतकरी वंचित असल्यामुळे आज पुन्हा ठरल्याप्रमाणे हे आंदोलन सुरू केल्याचे सांगून जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खातेवर क्लेमप्रमाणे पैसे सोडल्याचे मेसेज येत नाहीत तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन सुरू राहणार असल्याचे शंकर गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधी बोलताना सांगितले, त्यावेळी दयानंद चौधरी, गोटू पाटील, अरविंद चौधरी, बजिरंग चौधरी, नितीन कदम, बाजीराव चौधरी, श्रीहरी गायकवाड, सिध्दार्थ चौधरी, समाधान आगलावे, अखबर शेख, राजाभाऊ कदम, अतुल गरड, गोपाळ पाडुळे, अतुल भोस्कर, तानाजी उकिरडे, पांडुरंग घेमाड, प्रविण घेमाड, हनुमंत राऊत, दत्ता भोगे, विनायक घोडके, ज्ञानेश्वर पाटील, लालासाहेब गायकवाड, दत्तात्र्य पाटील, संतोष गुंड, रूषिकेश गायकवाड, चंद्रहास गायकवाड, दिपक गायकवाड आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply